शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्ली दुर्घटनेतील ‘त्या’ रहिवाशांना मिळणार साहाय्य

By admin | Updated: August 10, 2015 23:11 IST

ठाकुर्लीत मातृकृपा इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील रहिवाशांना मुख्यमंत्री अर्थसाहाय्य करणार असून त्यासंदर्भातील घोषणा ते लवकरच करतील, अशी माहिती भाजपाचे

डोंबिवली : ठाकुर्लीत मातृकृपा इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील रहिवाशांना मुख्यमंत्री अर्थसाहाय्य करणार असून त्यासंदर्भातील घोषणा ते लवकरच करतील, अशी माहिती भाजपाचे नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी दिली. शुक्रवारी संध्याकाळी ४.१५ ला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेत जखमींसह मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, असे साकडे घातले. चौधरींचे निवेदन घेत ते म्हणाले की, यासंदर्भात अधिवेशन काळात आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व माहिती मिळाली. आगामी काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी तातडीच्या स्वरूपात उपाययोजनाही करण्यात येतील. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी होती. त्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. लवकरच त्याबाबतची घोषणा करण्यात येईल. ते अर्थसाहाय्य किती असेल, याबाबतची माहिती मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली नसल्याचे सांगण्यात आले. सर्व निकष तपासून योग्य ती मदत निश्चित केली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या ती बाधित कुटुंबे कोठे राहत आहेत, याबाबतची माहिती विचारल्यावर चौधरी यांनी गेल्या आठवडाभरातील त्यांनी व नागरिकांनी केलेल्या मदतकार्यासंदर्भात माहिती दिली. घटना घडल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेतील नानासाहेब धर्माधिकारी हॉलमध्ये काहींना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. मात्र, तो हॉल सामाजिक कार्यासाठी आधीपासूनच देण्यात येत असून त्यासंदर्भातील तारखाही बुक झाल्या होत्या. परिणामी, तेथे एक मंगलकार्य असल्याने तेथून त्या रहिवाशांना महापालिकेच्या निवारा केंद्रात हलविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व कालावधीत होईल तेवढ्या सर्व सोयी महापालिकेने देण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)