शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘असहकारा’ने कर्जमाफी अडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:35 IST

थकबाकीदार शेतकºयांची शिफारस करणाºया सेवा सोसायट्यांच्या गटसचिवांनी जिल्ह्यातील सुमारे ४० दिवसांपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.

सुरेश लोखंडे । ठाणे : थकबाकीदार शेतकºयांची शिफारस करणाºया सेवा सोसायट्यांच्या गटसचिवांनी जिल्ह्यातील सुमारे ४० दिवसांपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र ठरणाºया १५ हजार ७२९ शेतकºयांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेकडे अद्यापही शिफारस  करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.  शेतीच्या कामात व्यस्त असलेला व आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफीचा मोठा आधार मिळणार होता,  मात्र टीडीसीसी बँकेला त्यांचा प्रस्ताव पाठवणारे ११३ गटसचिवांनी शासन व बँकेच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे त्यांनी या पात्र शेतकºयांच्या याद्या टीडीसीसीला दिल्या नाहीत. त्याचा फटका कर्जमाफीच्या पात्र शेतकºयांना बसला आहे. या गटसचिवांच्या प्रलंबित मागण्या मंजूर होईपर्यंत हे असहकार आंदोलन सुरूच राहणार आहे. यामुळे कर्जमाफ होऊनही त्यांच्या लाभापासून जिल्ह्यातील शेतकरी अद्याप वंचित आहे.ठाणे जिल्हा गटसचिव संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील या सेवा सोसायटींच्या गटसचिवांनी शासन व टीडीसीसी बँकेला कोणत्याही प्रकारची माहिती न पुरवण्याचे असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यात कर्जमाफीच्या लाभासाठी जिल्ह्यातील शेतकरी भरडला जात आहे. जिल्ह्यातील ४१० सोसायटींच्या ११३ गटसचिवांनी हे बेमुदत असहकार आंदोलनाचा फटका शेतकºयांना बसत आहे.   जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ७९ कोटी ५० लाखांच्या कर्जमाफींसह  ६२ कोटी २१ लाखांच्या पीक कर्ज माफीच्या लाभाला सुमारे १३ हजार १७४ शेतकरी पात्र आहेत. यामध्ये १७ कोटी २१ लाखांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाचा लाभ दोन हजार ५५५ शेतकºयांना झाला नाही. यामध्ये  एक हेक्टर शेती असलेल्या आठ हजार ८३२ लहान शेतकरी;  तर दोन हेक्टरपर्यंतचे सुमारे पाच हजार २५८ मध्यम शेतकºयांचा समावेश आहे.