शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेती करत जोपासली कला

By admin | Updated: August 17, 2016 03:04 IST

कर्जत म्हणजे कलाकारांची नगरी विशेषत: या नगरीत एका पेक्षा एक चित्रकार आहेत.

कर्जत : कर्जत म्हणजे कलाकारांची नगरी विशेषत: या नगरीत एका पेक्षा एक चित्रकार आहेत. बहुतेकांची चित्रे साता सामुद्रा पार गेली आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा नवोदित चित्रकार आपला ठसा उमटवीत आहेत. यापैकी अनेकांची चित्र प्रदर्शने मुंबईत आयोजित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अवघ्या सातव्या इयत्तेपर्यंत शिकलेला व परंपरागत शेती व्यवसाय करणारा कोणतेही चित्रकलेचे शिक्षण घेतलेला एक चित्रकार हरी फुलावरे याच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील नेहरू सेंटरच्या वातानुकूलीत कला दालनात सुरु आहे. कर्जत तालुक्यातील बीड गावामध्ये जेम तेम सातवी पर्यंत शिक्षण घेतलेला हरी फुलावरे विडलांबरोबर शेती व्यवसाय करीत होता. सात आठ वर्षांपूर्वी कर्जतमधील अंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार पराग बोरसे निसर्ग चित्र साकारण्यासाठी बीड गावाच्या परिसरात गेले होते त्यावेळी हरीची व त्यांची भेट झाली. त्यावेळी हरीने आपल्या कल्पकतेने बोरसे यांना त्या परिसरातील निसर्गाच्या विविध ठिकाणांची माहिती करून दिली. पराग बोरसे बीड गावाच्या परिसरात जाऊन चित्र काढून त्यांना वेगवेगळे रंग देऊ लागले. ही त्यांची कला मोठ्या कुतुहलाने हरी पहात असे व त्यावर विचार करीत असे. दोघांची मैत्री झाली, या सगळ्या घटनांनी हरी मधील कलाकार जागा झाला. त्याने आपली कला प्रत्यक्ष कन्हवासवर उतरविली आणि बोरसे यानां दाखिवली. हरीची कला पाहून बोरसे अक्षरश: थक्क झाले. मैत्रीचे रु पांतर गुरु शिष्यामध्ये कधी बदलले हे समजलेच नाही. त्यानंतर हरी शेती व्यवसाय सांभाळून आपली कला विकिसत करू लागला बोरसे त्याला मार्गदर्शन करू लागले आणि हरीला मुंबईत चित्र प्रदर्शन आयोजित करण्याची संधी मिळाली.आता ‘अनकॉट ब्युटी’ हे चित्र प्रदर्शन प्रदर्शन मुंबईतील नेहरू सेंटरच्या वातानुकुलीत कला दालनात सुरु आहे. सुंदर निसर्ग, देखण्या बागा, डौलदार बैलगाडी, विविध गावातील जीवन संस्कृती अशी अनेक चित्रे हरीने या प्रदर्शनात मांडली आहेत. निरीक्षण शक्ती, मार्गदर्शन आणि मेहनतीतून त्यांनी हे यश संपादित केले. (वार्ताहर)