शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत नगरसेवकांसाठी डॉक्टर, इंजिनीअर्सनाही संधी

By admin | Updated: November 16, 2015 02:16 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागण्यासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे

प्रशांत माने,  कल्याण कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागण्यासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. परंतु, महाराष्ट्र महानगरपालिका नियम २०१२ च्या कायद्यानुसार या पदासाठी महापालिकेच्या प्रशासकीय कामाचा अनुभव बंधनकारक केला असून याचा दांडगा अनुभव असलेल्या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, इंजिनीअर यांनाही या पदावर संधी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे राजकीय पक्षांतील इच्छुक आणि नाराजांची चांगलीच पंचाईत होणार आहे.स्वीकृतपदी निवड करताना सर्वच राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाते. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांना स्वीकृत पद देण्याचेही आमिष दाखविले जाते. त्यातच माजी नगरसेवकही पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून येण्यासाठी स्वीकृतचा आधार घ्यायचे, परंतु आता नव्या कायद्यानुसार याला खीळ बसणार आहे. एखाद्या व्यक्तीकडे महापालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान असेल किंवा अनुभव असेल तर ती व्यक्ती स्वीकृतसाठी पात्र ठरेल, अशी अट बंधनकारक झाली आहे. याचबरोबर डॉक्टरकीचा किमान पाच वर्षांचा अनुभव, तसेच शिक्षणतज्ञ, निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता, मुख्याध्यापक यांनाही प्राधान्य असणार आहे. सनदी लेखापाल, इंजिनीअर हेदेखील स्वीकृतसाठी पात्र ठरू शकणार आहेत. नगरपरिषदेचा मुख्याधिकारी किंवा महानगरपालिकेचा सहायक आयुक्त, उपायुक्त म्हणून काम करण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव तसेच किमान दोन वर्षांचा अनुभव असलेली महानगरपालिकेतून आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेली व्यक्तीसुद्धा स्वीकृतपदी असावी, अशी अट असून नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारीही या पदासाठी पात्र ठरू शकतो.