शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातील मस्जिद ट्रस्टची जागा वाढीव दराने भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST

ठाणे : वक्फ मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या मुंब्रा (जि. ठाणे) येथील कौसा जामा मस्जिद ट्रस्ट यांच्याकडील जागा वाढीव दराने ...

ठाणे : वक्फ मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या मुंब्रा (जि. ठाणे) येथील कौसा जामा मस्जिद ट्रस्ट यांच्याकडील जागा वाढीव दराने भाडेत्त्वावर देण्यास शासनाने मंगळवारी मान्यता दिल्याची माहिती अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यामुळे या ट्रस्टच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार असून त्याचा तेथील अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कौसा जामा मस्जिद ट्रस्टची मुंब्रा (जि. ठाणे) येथे २२१ गुंठे इतकी जागा आहे. या जागेला भाडेतत्त्वावर देण्यासाठी ट्रस्टने निविदाप्रक्रिया राबविली होती. वक्फ नियमानुसार जागेच्या रेडी रेकनर दराच्या किमान १ टक्के इतक्या रकमेइतके वार्षिक भाडे मिळायला हवे. ही रक्कम १४ लाख रुपये इतकी होती. तथापी, ही जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या निविदाप्रक्रियेमध्ये खडावली एज्युकेशन सोसायटी यांनी सर्वाधिक दर सादर केला. त्यामुळे त्यांच्या निविदेस मान्यता मिळाली. या व्यवहारास वक्फ मंडळाने मान्यता दिली. यास शासनामार्फतही मान्यता देण्यात आली. यानुसार या भाडेकराराच्या माध्यमातून कौसा जामा मस्जिद ट्रस्टला वार्षिक २९ लाख ११ हजार १११ रुपये इतके भरीव भाडे प्राप्त होणार आहे. वक्फ नियमानुसार निर्धारित किमतीच्या जवळपास दुप्पट इतकी ही रक्कम असून, यामुळे ट्रस्टच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.

राज्यातील वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या इतर संस्था, ट्रस्ट यांनीही याच पद्धतीने पुढे येऊन आपल्या संस्थेच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल, यासाठी प्रयत्न करावेत. वाढीव उत्पन्नाचा उपयोग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी करावा. शासनाकडे येणाऱ्या अशा सर्व प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल, असे मलिक म्हणाले.