शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनसाठी २२ ला अर्जस्वीकृती

By admin | Updated: February 17, 2017 02:05 IST

कोणत्याच राजकीय पक्षाने अर्ज न भरल्याने केडीएमसीच्या परिवहन समितीची पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक २८ फेब्रुवारीला होत

कल्याण : कोणत्याच राजकीय पक्षाने अर्ज न भरल्याने केडीएमसीच्या परिवहन समितीची पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक २८ फेब्रुवारीला होत आहे. या निवडणुकीसाठी २२ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. शुक्रवारपासून अर्जांचे वितरण होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धत अवलंबली जाणार असल्याने ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.एकीकडे अर्ज दाखल न झाल्याने परिवहन समितीची निवडणूक पुढे ढकलण्याची नामुश्की केडीएमसी प्रशासनावर ओढवली आहे. त्यात निवडणुकीची गुप्त मतदानाची पद्धत चुकीची असल्याबाबतची हरकत महापालिकेचे माजी सचिव चंद्रकांत माने यांनी घेतली आहे. निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी प्रमाणशीर प्रतिनिधित्वानुसार निवडणूक घेण्याची तरतूद केली असताना चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. नियमानुसार प्रक्रिया पार न पाडल्यास नगरविकास विभागाकडे तक्रार तसेच प्रसंगी न्यायालयात जाण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र, सहा सदस्यांच्या निवडीसाठी गुप्त मतदानाची प्रक्रियाच राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई, ठाणे, उल्हासनगर आणि अन्य महापालिकांच्या निवडणुकांचे मतदान आटोपताच दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ फेब्रुवारीला अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, शिवसेना-भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने सदस्यांना संधी देताना डावलल्यांची नाराजीही ओढून घ्यावी लागणार आहे. याचा प्रत्यय मागील प्रक्रियेच्या वेळी आला होता. या वेळीदेखील हे चित्र कायम राहण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)