शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत लाखोंचा घोटाळा

By admin | Updated: September 13, 2016 02:30 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळेवाटपावेळी काही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून ते फुलव्यापाऱ्यांना परस्पर वाटून त्यात ५९ लाखांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांचे प्रकरण नव्याने समोर आले

मुरलीधर भवार ,  कल्याणकल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळेवाटपावेळी काही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून ते फुलव्यापाऱ्यांना परस्पर वाटून त्यात ५९ लाखांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांचे प्रकरण नव्याने समोर आले आहे. या प्रकरणी सचिवांच्या चौकशीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्याने त्यांची पाठराखण केल्याचा आरोप झाल्याने नवा अधिकारी नेमून चौकशी करावी, असे आदेश पणन संचालकांनी कोकण विभागीय सहनिबंधकांना दिले आहेत. त्यानंतरही नवा अधिकारी नेमण्यात आलेला नाही.बाजार समितीतील ११९ गाळ्यांपैकी ५४ सभासदांचे गाळे रद्द करण्यात आले आणि ते भाजीपाला विक्रेत्यांना न देता फुलविक्रेत्यांना दिले गेले. त्यात समितीच्या सचिवांनी ५९ लाखांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार भाजीपाला विक्रेत्यांनी पणन संचालकांकडे केली होती. त्यासाठी नेमलेला चौकशी अधिकारीच चौकशी न करता त्यांना सचिवांना पाठीशी घालत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. २०१० साली बाजार समितीने उभारलेल्या नव्या गाळ्यांपैकी ११९ गाळ्यांचे वाटप व्यापाऱ्यांना करण्यात आले. त्यापैकी ५४ व्यापाऱ्यांंचे गाळेवाटप रद्द करण्यात आल्याचे बाजार समितीने त्यांना कळवले. हे वाटप रद्द करताना या व्यापाऱ्यांनी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे कारण समितीचे सचिव श्यामकांत चौधरी दिले होते. हे गाळे फुलविक्रेत्यांना देण्यात आले आणि त्यात ५९ लाखांचा गैरव्यवहार झाला, असा आरोप लक्ष्मी मार्केट भाजीपाला संघटनेचे सचिव रामदास यादव यांनी केला होता. त्याबाबत त्यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली, तेव्हा परवान्यांचे नूतनीकरण करून गाळ्यांचे वाटप करावे, असे पणन संचालकांनी सांगितले होते. तसे पत्रही यादव यांच्याकडे आहे. मात्र, त्यांच्या या पाठपुराव्याला सचिव चौधरी यांनी दाद दिली नाही. त्यानंतर, भ्रष्टाचाराबाबत तक्रारी आल्याने पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधक दिलीप उड्डाण यांना चौकशी करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी योग्य चौकशी न करता चौधरी यांना पाठीशी घातल्याचा आरोप तक्रारदार व्यापारी आणि संघटनेने केला. चौधरी यांच्याविरोधात अनेक अर्ज संचालकांकडे आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी तयार केलेल्या चौकशी अहवालाविरोधात तक्रारदार अपिलात गेले. त्यामुळे हा चौकशी अहवाल रद्द करण्यात आला. गाळे रद्द करण्याच्या प्रक्रियेत सचिवांकडून झालेल्या भ्रष्टाचाराविषयी तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी जिल्हा उपनिबंधकांकडे न देता इतर अधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश पणन संचालकांनी विभागीय सहनिबंधकांना दिले आहेत. पण, या आदेशाची अद्याप अंमलबजावणीच केली जात नसल्याचे तक्रारदार यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)