शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

ठाण्यात आणखी एक कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या झाली १४, खरबदाराची उपाय म्हणून कळव्यातील ते हॉस्पीटल पालिकेने केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 16:28 IST

ठाण्यात दोन दिवसात तीन कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ही १४ झाली आहे. त्यातही त्या वैद्यकीय सेवा देणाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याबरोबरच कळव्यातील एक खाजगी रुग्णालय देखील पालिकेने आता सील केले आहे.

ठाणे : कळव्यातील साईबाबा नगर परिसरात अढळलेला ५९ वर्षीय कोरोना रु ग्णाने प्राथमिक उपचार कळव्यातीलच जवळच्या खाजगी रु ग्णालयात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाच्या वतीने हे रु ग्णालयच आता सील करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमधील स्टाफला हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन करण्यात आले असून नेमके किती जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. दुसरीकडे ठाण्यात शुक्रवारी आणखी एक रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह म्हणून आढळला आहे. त्यामुळे ठाण्यातील रुग्णांची संख्या ही १४ वर गेली आहे.ठाणे शहरात मागील दोन दिवसांपासून एकही कोरोना पॉझीटीव्ह आढळला नव्हता, त्यामुळे ठाण्यासाठी गेले दोन दिवस आशादाय चित्र होते. मात्र गुरु वारी पुन्हा एकदा यामध्ये दोन रु ग्णांची भर पडली असून या दोन्ही केसेस प्रशासनाची झोप उडवून देणाऱ्या आहेत.

                  काजूवाडी परिसरात एका खाजगी दवाखाना असलेल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या संपर्कातील रुग्णांचा शोध सुरु आहे. दुसरीकडे कळव्यातील साईबाबा नगरमध्ये ज्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे, त्या वृद्धाने जवळच्याच एका खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार घेतले असून ३० आमि ३१ मार्चला ते याच हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये आले होते अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल सुद्धा आता क्वॉरन्टाइन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने हे हॉस्पिटल सील करण्यात आले असून यामध्ये हॉस्पिटलचा स्टाफ आणि इतर रु ग्ण अशा किती जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. कळव्यातील हे सर्वात जुने हॉस्पिटल असून या ठिकणी ओपीडीसाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आता या रु ग्णांच्या संपर्कात आलेले ओपीडीमधील इतर रु ग्ण, तसेच ज्या डॉक्टरांनी या रु ग्णाला तपासले आहे त्या डॉक्टरांच्या देखील संपर्कात आलेले इतर रु ग्ण या सर्वांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता प्रशासना समोर आहे.           ठाणे शहरात गुरु वारी एका वैद्यकीय अधिकारी आणि एका वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर शुक्रवारी यात आणखी एका रु ग्णांची भर पडली आहे. लोढा पॅरेडाइज या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. सध्या या रु ग्णावर मुंबईच्या एका खाजगी रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. या रु ग्णाला ट्रॅव्हल हिस्ट्री आहे का ? तसेच तो कोणाच्या संपर्कात आला होता का याची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे शहरात आता कोरोना पॉसिटीव्ह रु ग्णांची संख्या १४ झाली असून या रु ग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या