शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांविरोधात संताप

By admin | Updated: March 20, 2017 02:00 IST

उत्तन-गोराई परिसरातील पर्यटनावर आधारित एमएमआरडीएचा विकास आराखडा कायम ठेवत मुख्यमंत्र्यांनी नियोजन

मीरा रोड : उत्तन-गोराई परिसरातील पर्यटनावर आधारित एमएमआरडीएचा विकास आराखडा कायम ठेवत मुख्यमंत्र्यांनी नियोजन प्राधिकरण म्हणून ही गावे पुन्हा मुंबई व मीरा-भार्इंदर महापालिकेकडे सुपूर्द केली आहेत. एमएमआरडीएच्या विकास आराखड्यास स्थानिकांनी विरोध केला असताना मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे आंदोलकांनी संताप व्यक्त करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मुंबई महापालिका हद्दीतील मनोरी, गोराई-कुळवेम, तर मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील उत्तन, चौक, पाली, तारोडी, डोंगरी, मोर्वा या गावांसाठी सरकारने एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. ही गावे नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहेत. या भागाकडे भूमाफियांसह बडे उद्योगपती, राजकारणी तसेच सरकारी अधिकाऱ्यांची नेहमीच वक्रदृष्टी राहिलेली आहे. त्यातच सरकार व एमएमआरडीएविरोधात धारावी बेट बचाव समितीच्या माध्यमातून येथील विविध मच्छीमार-शेतकरी संस्था, कोळी जमात, चर्च तसेच अन्य संस्थांनी आंदोलन छेडले आहे. एमएमआरडीएच्या विकास आराखड्या विरोधात हजारोंनी हरकती नोंदवल्या. सागरीमार्ग, खाडीपूल, मत्स्य पर्यटन, जलक्रीडा, वारेमाप बांधकामे यातून उलट पर्यावरणाची हानी होत आहे. प्रदूषण तसेच गुन्हेगारी, गैरप्रकार वाढणार आहेत. मच्छीमार, शेतकरी व स्थानिक व्यावसायिकांवर उद्ध्वस्त होण्याची वेळ येणार असल्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांच्या मागण्या व आंदोलनाला न जुमानता एमएमआरडीएचा विकास आराखडा मंजूर करत तोच कायम ठेवला. आता १६ मार्चला नगरविकास विभागाने अधिसूचना काढून एमएमआरडीएचा विकास आराखडा कायम ठेवत ही गावे आता नियोजन प्राधिकरण म्हणून पुन्हा मुंबई व मीरा-भार्इंदर महापालिकेकडे सोपवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आता गोराई-मानोरी परिसर पुन्हा मुंबई महापालिकेच्या तर उत्तन, चौक, पाली, तारोडी, डोंगरी ही गावे मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अखत्यारित आली आहेत. दोन्ही महापालिकांना एमएमआरडीएच्या विकास आराखड्याचीच अंमलबजावणी करावी लागणार आहे. एमएमआरडीएच्या काळात या परिसरात वारेमाप बेकायदा बांधकामे झाली असून त्यावर कारवाई या दोन्ही महापालिका करणार का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. एमएमआरडीएची नियुक्ती करताना मोर्वा गावाच्या भागाचाही समावेश होता. परंतु, एमएमआरडीएची नियुक्ती रद्द करण्याच्या आदेशात मोर्वा गावाचा उल्लेख नसल्याने गोंधळ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)