शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईवर २६० बोअरवेलची मात्रा

By admin | Updated: March 30, 2016 01:46 IST

जिल्ह्यातील ५१९ गावपाड्यांना दरवर्षाप्रमाणे या वर्षीही तीव्र पाणीटंचाई आहे. पण जवळपासच्या विहिरी, डोह आदींच्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या तेथील ग्रामस्थांसाठी आता बोअरवेलव्दारे

ठाणे: जिल्ह्यातील ५१९ गावपाड्यांना दरवर्षाप्रमाणे या वर्षीही तीव्र पाणीटंचाई आहे. पण जवळपासच्या विहिरी, डोह आदींच्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या तेथील ग्रामस्थांसाठी आता बोअरवेलव्दारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केले आहे. त्यासाठी २६० बोअरवेल प्रस्तावित केल्या आहेत. त्यापैकी सर्वेक्षणांती १०३ बोअरवेल पात्र ठरल्या आहेत. त्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे.या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक कोटी ५६ लाख रूपये खर्च जि. प. अपेक्षित धरला आहे. मात्र १०३ ग्रामपंचायतींमध्येच बोअरवेलचेच काम हाती घेण्यात आले. शहरांमध्ये कडकडीत पाणीटंचाई सुरू आहे. मात्र ग्रामीण भागातही अधिपासून सुरू असलेल्या टंचाईवर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी बोअरवेलचे काम हाती घेतले आहे. यासाठी ठिकठिकाणच्या २६० बोअरवेल पैकी गावखेड्यांमध्ये जाऊन २३६ ठिकाणचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित २४ बोअरवेलचे सर्वेक्षण अंबरनाथ तालुक्यात बाकी आहे. सर्वेक्षण झालेल्यापैकी १०३ ठिकाणे बोअरवेलसाठी पात्र ठरले आहेत. त्यांचे काम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. डी. धांदवड यांनी लोकमतला सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४३० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ८०९ गावपाडे आहेत. यातील १३२ गावे व ३८७ पाडे आदी ५१९ गावपाडे तीव्र पाणीटंचाईच्या चक्र व्युहात आहेत. यावर मात करण्यासाठी दोन कोटी ६४ लाख रूपये खर्चाची तरतूद जिल्हा प्रशासनाने केली आहे. पण आजपर्यंतही जिल्ह्यातील कोणत्याही गाव पाड्यातून टँकरची मागणी आलेली नसल्याचा दावा धांदवड यांनी केला आहे.