शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ रुग्णवाहिकांना अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:55 IST

तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ यांच्याअभावी केडीएमसीच्या रुग्णालयातील कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच दुसरीकडे चालक नसल्याने बहुतांश रुग्णवाहिका या जागेवरच उभ्या आहेत.

कल्याण : तज्ज्ञ डॉक्टर, तंत्रज्ञ यांच्याअभावी केडीएमसीच्या रुग्णालयातील कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच दुसरीकडे चालक नसल्याने बहुतांश रुग्णवाहिका या जागेवरच उभ्या आहेत. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे त्यांनी सांगितले.केडीएमसीकडे चार जुन्या रुग्णवाहिका, दोन फिरते दवाखाने आणि दोन शववाहिन्या आहेत. चार रुग्णवाहिकांपैकी प्रत्येकी दोन वाहने कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाला दिली आहेत. यातील प्रत्येकी एक रुग्णवाहिका सध्या बंद आहे. तर या रुग्णालयांना प्रत्येकी एक फिरता दवाखाना आणि शववाहिनी दिली गेली आहे. या व्यतिरिक्त आमदार गणपत गायकवाड आणि नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून दोन कार्डियक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. पण त्या वापराअभावी जागेवर उभ्या आहेत. रुग्णालयाच्या आवारात चालक आणि डॉक्टर, नर्सेसविना खितपत पडलेल्या या रुग्णवाहिकांची पाहणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, कल्याण शहरअध्यक्ष कौस्तुभ देसाई, शहरसचिव महेश मोरे, सागर जेधे, संजय राठोड आदींनी केली.एकीकडे साथीच्या आजारांनी नागरिक बेजार झाले असताना दुसरीकडे रुग्णालयाच्या आवारात धूळखात पडलेल्या रुग्णवाहिकांबाबत त्यांनी डॉ. रोडे यांची भेट घेत त्यांना विचारणा केली. यावर त्यांनी रुग्णवाहिका चालवण्यासाठी चालक नसल्याकडे लक्ष वेधले. कार्डियक रुग्णवाहिकेसाठी डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाºयांचीही आवश्यकता आहे, परंतू त्यांचीही कमतरता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर रुग्णवाहिका असूनही गरजू रुग्णांना त्या उपलब्ध करू शकत नाही, याबाबतची खंत पदाधिकाºयांनी या वेळी व्यक्त केली.केवळ ‘शो’बाजी कशाला करता?आमदार निधीतून कार्डियक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या, परंतु केवळ ‘शो’बाजीनंतर त्यांची काय अवस्था आहे, याची जाणीव आमदारांना नाही. त्यातच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वत: डॉक्टर आहेत. तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे वैद्यकीय विभागाशी निगडीत असलेले खाते आहे. असे असतानाही रुग्णालयांना भेडसावणारे अपुरे मनुष्यबळ ही एकप्रकारे सत्ताधाºयांसाठी नामुष्की आहे, अशी प्रतिक्रिया मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी ‘लोकमत’ला दिली.