शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या तरूणाची कबड्डीमध्ये भरारी

By admin | Updated: June 28, 2017 03:20 IST

घरची परिस्थिती बेताची असतानाही आपल्या जिद्दीच्या जोरावर अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील एका तरूणाने कबड्डीमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे.

पंकज पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : घरची परिस्थिती बेताची असतानाही आपल्या जिद्दीच्या जोरावर अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील एका तरूणाने कबड्डीमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. आज याच कबड्डीच्या जोरावर या तरुणाने आपला कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. या तरूणाने प्रो कबड्डी स्पर्धेत ‘दबंग दिल्ली’ संघात स्थान निश्चित केले आहे. अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापीवली गावातील तुषार भोईर या तरूणाला लहानपणापासूनच कबड्डीची आवड होती. मात्र भविष्यात या क्षेत्रातच आपले भवितव्य निश्चित करण्यासाठी त्याने कबड्डी खेळावरच आपले लक्ष केंद्रीत केले. मातीच्या मैदानावर रमलेला तुषारला भरारी घेण्याची जिद्द असल्याने त्याने मॅटवरील कबड्डीवर आपले लक्ष केंद्रीत केले. देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅटवरच कबड्डीचे सामने होत असल्याने त्याने मॅटवर कबड्डीचा सराव सुरू केला. मात्र अंबरनाथ तालुक्यात मॅटवरील कबड्डीचा सराव करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र किंवा संघ नसल्याने त्याने कल्याणच्या शिवशंकर संघाकडे धाव घेतली. या संघात त्याने रितसर मॅटवरील सराव सुरू केला. कल्याणच्या या नावाजलेल्या संघातून त्याने खेळताना राज्य पातळीवर सर्वाेत्कृष्ट कामगिरी बजावली. कुमार गटाचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत असतानाच त्याला एक अनोखी संधी मिळाली. प्रो कबड्डी स्पर्धेतील दिल्ली दबंग संघाकडून खेळाडूंची निवड करण्यासाठी वडाळा येथे शिबिर झाले. या शिबिरात तुषार याने हजेरी लावत या निवडचाचणीत चांगली कामगिरी बजावली. बचाव फळीत खेळताना अनेक खेळाडूंना त्याने आपल्या खेळातील दम दाखवला. त्याचा हा खेळ पाहून दबंग दिल्ली संघाने त्याची संघात निवड केली आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीवर मात करत त्याने कबड्डीमध्ये निर्माण केलेली जागा ही ग्रामीण भागातील खेळाडूंसांठी प्रेरणादायी ठरणारे आहे. तुषार याचे शालेय शिक्षण हे आंबेशिव या गावात झाले. तुषारने कबड्डीमधील आपले गुरू कल्याणचे यशवंत यादव अािण कोल्हापूरचे रमेश भेंडीगिरे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून प्रोत्साहन घेत त्याने हे शिखर गाठले आहे. खास पैलू सुधारण्यात शिवशंकर क्रीडा मंडळाचा मोठा वाटा राहिला आहे.