शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जपानमध्ये अमरजित पांडेला रजतपदक

By admin | Updated: August 30, 2016 02:45 IST

जपान येथे झालेल्या दहाव्या जागतिक अर्थ सायन्स आॅलिम्पियाडमध्ये कल्याणच्या अमरजित पांडे याने चमकदार कामगिरी करीत देशाला रजतपथकाची कमाई करून दिली.

कल्याण : जपान येथे झालेल्या दहाव्या जागतिक अर्थ सायन्स आॅलिम्पियाडमध्ये कल्याणच्या अमरजित पांडे याने चमकदार कामगिरी करीत देशाला रजतपथकाची कमाई करून दिली. या जागतिक परीक्षेत २८ देशांतील तब्बल १०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. २३ व २४ आॅगस्टला झालेल्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश मिळवून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमरजितने रजतपदक प्राप्त केले. अमरजित याने आपले प्राथमिक शिक्षण कल्याणच्या के.सी. गांधी विद्यालयातून घेतले असून मुलुंड विद्यामंदिर महाविद्यालयात तो बारावीचे शिक्षण घेत आहे. जागतिक अर्थ सायन्स आॅलिम्पियाडमध्ये सहभागी होऊन मोठे यश मिळवणे, हे अमरजितचे स्वप्न होते.त्याची दृढ इच्छाशक्ती पाहून त्याचे वडील विकास आणि आई पूनम यांनी त्याच्या इच्छाशक्तीला बळ दिले. त्याचप्रमाणे त्याच्या हुशारीची चुणूक पाहून मुलुंड विद्यामंदिर महाविद्यालयातील शिक्षकांनीदेखील त्याला मार्गदर्शन केले. जागतिक अर्थ सायन्स आॅलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याकरिता देशांतर्गत पात्रता परीक्षेला देशातून तब्बल साडेसहा हजार विद्यार्थी बसले होते. यामध्ये देशातून २२ विद्यार्थ्यांची निवड उपांत्यपूर्व परीक्षेसाठी करण्यात आली. या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या वतीने चेन्नई येथे तब्बल २१ दिवस अर्थ सायन्स विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर, या २२ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. जागतिक अर्थ सायन्स आॅलिम्पियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केवळ ४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये यश प्राप्त करून महाराष्ट्रामधून सहभागी होण्याचा मान अमरजित याने पटकावला.दरम्यान, जपान येथे झालेल्या अंतिम परीक्षेत चमकदार कामगिरी करीत अमरजित याने भारताला रजतपदकाची कमाई करून दिली. त्याच्या या यशासाठी मदत करणाऱ्या ‘जिआॅलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया’ या बंगलोर येथील संस्थेचे आणि त्याच्या चेन्नई येथील ‘अण्णा विद्यापीठा’च्या प्राध्यापिका हेमा अच्चुभन यांचेदेखील त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)