शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

निवडणूक आराखड्यावर सर्व पक्षांच्या हरकती

By admin | Updated: January 9, 2017 07:29 IST

महापालिका निवडणुकीसाठी ९० नगरसेवकांसाठी २३ प्रभागांची निर्मिती करत प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर केला आहे. मात्र, प्रभाग आराखडा जाहीर करताना

भिवंडी : महापालिका निवडणुकीसाठी ९० नगरसेवकांसाठी २३ प्रभागांची निर्मिती करत प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर केला आहे. मात्र, प्रभाग आराखडा जाहीर करताना निवडणूक अधिकारी श्रीकांत औसरकर यांनी शहराची भौगोलिक परिस्थिती नजरेसमोर न ठेवता प्रभागांच्या सीमा आराखड्यात घेताना चुकीच्या पद्धतीने घेतल्या. यामुळे प्रभागरचनेचा गोंधळ झाला. त्यावर, शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हरकती दाखल केल्या आहेत. प्रभागांची निर्मिती करताना शहरातील मोठे रस्ते,गल्ली, नाले,डोंगर,लहान रस्ते, उड्डाणपूल यांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्याकडे डोळेझाक करून प्रभागनिर्मिती जाहीर केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याविरोधात महापौर तुषार चौधरी यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक अशा ३४ जणांनी हरकती पालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केल्या आहेत.वाढत्या हरकतींमुळे निवडणूक आयोग व पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मान्यतेने गुगलद्वारे प्रसिद्ध केलेला प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून या हरकतींवर आयुक्त व निवडणूक आयोग कुठला निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीसाठी नुकतेच जातीनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. त्यानंतर नियोजित कार्यक्र मानुसार पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागरिकांसाठी प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला आहे. पालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या तसेच त्याची व्याप्ती आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागांची माहिती दिली आहे. तसेच २३ प्रभागांच्या सीमांचे नकाशे प्रसिद्ध केले आहेत. हा आराखडा पाहून पालिका क्षेत्रातील विविध नागरिकांनी तसेच सर्वच राजकीय पक्षांनी हरकती घेऊन तक्र ारी अर्ज पालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. या तक्र ारींमध्ये १८ नागरिक, १३ नगरसेवक व ३ सामाजिक संस्था असे एकूण ३४ अर्ज निवडणूक शाखेकडे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)