शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सवरांच्या घरावर काढणार पुन्हा मोर्चा

By admin | Updated: October 15, 2016 06:34 IST

आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरावर येत्या सोमवारी (दि. १७) मोर्चा काढण्याचा इशारा

वाडा : आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या घरावर येत्या सोमवारी (दि. १७) मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने एका निवेदनाद्वारे दिला आहे. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाची योजना आहे. त्याची अंमलबजावणी आदिवासी विभागाने स्वतंत्र केलेली नाही. ही जबाबदारी महिला व बालविकास खात्यावर ढकलली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे काम आदिवासी विकास विभागाने करावे, या योजनेंंतर्गत गर्भवती मातांना चपाती, भाकरी, ५० ग्रॅम तांदूळ, ३० ग्रॅम कडधान्ये, शेंगदाणा लाडू, अंडी, केळी, नाचणी सत्त्व, ५० ग्रॅम हिरव्या भाज्या इत्यादी वस्तू २५ रुपयांत खरेदी करणे अशक्य असल्याने अमृत आहार योजनेची रक्कम ५० रुपये करून द्यावी, आहार तयार करण्यासाठी भांडी खरेदी करण्याकरिता एक हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीत तवा, परात, झाकण, पाण्याची टाकी, बादली आदी वस्तू खरेदी करता येत नसल्याने या निधीत वाढ करावी, आहार तयार करण्यासाठी शेगड्या काही ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पंरतु गॅस सिलिंडर देण्यात आलेले नाही. ते देण्यात यावेत. आहार तयार करण्यासाठी प्रत्येक दिवशी १० रुपये किंवा महिन्याला २५० रुपये मोबदला देण्यात येतो. ही रक्कम अत्यंत कमी आहे. ती दरमहा एक हजार करण्यात यावी. (वार्ताहर)