शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शहरातील अर्थव्यवस्था होणार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 15:50 IST

कोरोनामुळे लॉकडाऊन झालेली ठाण्यातील अर्थव्यवस्था आता अडीच महिन्यानंतर सुरु होणार आहे. सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत ही दुकाने सुरु राहणार आहेत. या कालावधीत नागरीकांनी सोशल डिस्टेसींगचे पालन करावे असे आवाहनही पालिकेने केले आहे.

ठाणे : कोरोनामुळे लॉकडाऊन झाला होता. या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्वच अर्थव्यवस्था मागील अडीच महिने ठप्प होती. अखेर आता ही अर्थव्यवस्था शुक्रवार पासून सुरु होणार आहे. शुक्र वारपासून सम-विषम पद्धतीने शहरातील बाजारपेठा, इतर दुकाने सुरु होणार आहेत. यामुळे शहराची ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रु ळावर येण्याची चिन्हे असून त्याचबरोबर ठाणेकरांना जीवनावश्यक वस्तुंव्यतिरिक्त आता आवश्यक असलेल्या इतर वस्तु मिळण्याचा या निमित्ताने मोकळा झाला आहे. परंतु या दुकानांमध्ये गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.            ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडीच महिन्यापासून शहरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तु, दुध, औषधालये आणि भाजीपाला दुकानांव्यतिरिक्त इतर वस्तुंची दुकाने बंद आहेत. त्यात कपडे, हार्डवेअर, स्टेशनरी तसेच अन्य साहित्यांचा दुकानांचा समावेश होता. या बंदीमुळे शहराची अर्थव्यवस्था ठप्प झाल्याचे चित्र आहे. मात्र, ही अर्थव्यवस्था आता पुन्हा रु ळावर आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले असून त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाचा आधार घेऊन शहरातील बाजारपेठा आणि इतर साहित्यांची दुकाने सुुरु करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयानंतर प्रभाग समतिीस्तरांवर सम-विषम पद्धतीने दुकाने कशी सुरु करायची याचे नियोजन प्रशासनाने सुरु केले होते. तसेच या नियोजनासाठी स्थानिक व्यापाऱ्यांसोबतही प्रशासनाने बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार रस्त्यांवरील दुकानांच्या हद्दीही निश्चित करण्यात आल्या आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील राम मारु ती रोड, गोखले रोड, तलावपाळी, ठाणे मुख्य बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या आस्थापना आहेत. तर जांभळीनाका मोठी भाजीमंडई, खारकर आळीत मोठी धान्य बाजारपेठ आहे. हे सर्वच शुक्र वारपासून सुरु होणार आहे. तर शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागात जीवनावश्यक वस्तुंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरु केली जाणार आहेत, मॉल आणि मार्केट कॉम्पलेक्स वगळता सर्व बाजारपेठ आणि दुकाने सम-विषम पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार रस्त्यांच्या एका बाजुची दुकाने सम तारखांना उघडण्यात येणार आहेत तर रस्त्याच्या दुसया बाजुची दुकाने विषम तारखांना उघडण्यात येणार आहेत. ही दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खुली राहणार आहेत. परंतु या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच दुकानदारांनी देखील याची काळजी घ्यावी असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या