शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसानंतर कट्ट्यावर कलाकृतींची बरसात

By admin | Updated: June 28, 2017 03:17 IST

शनिवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे रविवारी दुपारपर्यंत कट्टा आणि सभोवताली सुमारे १ फुटभर पाणी असूनही अभिनय कट्टयाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शनिवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे रविवारी दुपारपर्यंत कट्टा आणि सभोवताली सुमारे १ फुटभर पाणी असूनही अभिनय कट्टयाच्या कलाकारांनी निराश न होता एकत्र येत पाणी उपसून काढले. आणि कट्टयावरचे प्रेम आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अवघ्या काही तासांनी सायंकाळी कट्टयावर एकापेक्षा एक सरस कलाकृतींची बरसात करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. रविवारच्या पावसाने कट्टा आणि कट्टयाच्या कार्यालयातही पाणी साचले होते. मात्र, सर्व कलाकारांच्या एकजुटीमुळे रविवारी सायंकाळीही ३३० वा कट्टा रंगला. रसिकांना अभिनय कट्ट्यावर फिल्मी चक्कर अंतर्गत फिल्मी संडे अनुभवता आला. फिल्मी चक्कर या सदरामध्ये चंदेरी दुनियेतील आईना, जुदाई, वजूद, गब्बर, शेहनशाह अशा प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळाले. अर्चना वाघमारे आणि शिवानी देशमुख यांनी आईना या चित्रपटातील प्रसंग सादर केला तर तन्नू वेड्स मन्नू चित्रपटातील मनू आणि तनुची भूमिका अनुक्रमे आदित्य नाकती आणि वीणा छत्रे यांनी साकारत उपस्थितांची दाद मिळवली. मुगल - ए - आजम चित्रपटातील प्रसंग अभिषेक जाधव आणि सुरज परब यांनी दमदाररित्या सादर केले. जुदाई या चित्रपटातील प्रसंग श्रावणी कदम, रु क्मिणी कदम, प्रतीकेश मोरे, स्वप्नील काळे या कलाकारांनी सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फिल्मी चक्करमधील हास्यविनोद असेच सुरु राहिले ते वैभव जाधव आणि हितेश नेमाडे यांनी मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील सादर केलेल्या प्रसंगांमुळे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘वजूद’ या चित्रपटातील क्लायमॅक्स स्वप्नील काळे आणि विणा छत्रे यांनी रंगविला. तर ज्या चित्रपटाशिवाय हिंदी चित्रपटाचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही असा शोले हा प्रसिद्ध चित्रपट कलाकारांनी १५ मिनिटांत कट्टयावर उभा केला. यामध्ये नवनाथ कंचार, स्वप्नील माने , कल्पेश डुकरे, दीपक मुळीक, शुभांगी गजरे यांनी विविध व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.