शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीच्या परवानगीवरून पालिका प्रशासनाची छाटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2016 02:26 IST

एकीकडे ठाणे महापालिका वृक्षलागवडीवर कोट्यवधींची उधळपट्टी करीत असताना दुसरीकडे पालिकेचीच वृक्ष प्राधिकरण समिती बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी वृक्षतोडीला सरसकट

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिका वृक्षलागवडीवर कोट्यवधींची उधळपट्टी करीत असताना दुसरीकडे पालिकेचीच वृक्ष प्राधिकरण समिती बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी वृक्षतोडीला सरसकट परवानगी देत असल्याने समितीचा कारभार, पालिकेची दुटप्पी भूमिका यावर आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या समितीच्या बैठकीत बिल्डरांच्या हिताच्या तब्बल १,७४९ वृक्षतोडीला परवानगी देण्यात आली. ती देताना समितीमधील सदस्यांनी विरोध केल्याची बाब आता समोर येऊ लागली आहे. प्रशासनाने दबाव आणून हे विषय मंजूर करून घेतल्याचा आरोप समितीमधील सदस्य करू लागले आहेत. समितीच्या या वादग्रस्त निर्णयाविरोधात राजकीय मंडळीही सरसावली आहेत. मागील आठवड्यात झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांसाठी-विकासकामांसाठी तब्बल १,७४९ वृक्षतोडीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यापैकी ८३१ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे, तर तब्बल ९१८ झाडे कायमची तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यातच रस्ता रंदीकरणाच्या आड येणाऱ्या झाडांचेही प्रस्ताव आहेत. रुंदीकरणाआड येणाऱ्या ३६३ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे, तर १३९ झाडे कायमची तोडली जाणार आहेत. मागील महिन्यात झाडांच्या कत्तलीची दखल घेऊन आयुक्तांनी वृक्ष तोडण्याच्या पद्धतीला आक्षेप घेतला होता. तसेच झाडे सरसकट तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्राेपण करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आयुक्तांचे आदेश वृक्षप्राधिकरण समितीच्या कानांपर्यंत कदाचित न पोहोचल्याने एका बांधकाम व्यावसायिकासाठी तब्बल सहा, तर एकासाठी तब्बल ८०० झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. हीच परवानगी समितीच्या अंगलट आली आहे. (प्रतिनिधी)आयुक्तांच्या आदेशाचा दबावआयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसारच वृक्षतोडीचे प्रस्ताव पटलावर आणल्याचा आरोप समितीमधील सदस्यांनी केला असून थेट प्रशासनावर शरसंधान साधले आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्यापूर्वी त्याला महासभा अथवा वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी घेणे अपेक्षित असताना हा प्रस्ताव पालिका प्रशासन सरसकट लादत असल्याचा गौप्यस्फोटही सदस्यांनी केला आहे. त्यामुळे ही सभाच बेकायदा असल्याचा त्याचा दावा आहे. प्रशासनाने आणलेल्या या विषयांवर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता ‘आयुक्तांचे आदेश’ असल्याचा दबाव आणत हे प्रस्ताव मंजूर करून घेतल्याचेही सदस्यांचे म्हणणे आहे.