शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून ‘त्या’ बांधकामांवर कारवाई

By admin | Updated: May 23, 2016 02:40 IST

सर्वपक्षीय संघर्ष समितीला मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन त्यांनी पाळले नाही. त्याचा राग समिती कल्याण-डोंबिवली महापालिकेवर काढत आहे

मुरलीधर भवार, कल्याणसर्वपक्षीय संघर्ष समितीला मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन त्यांनी पाळले नाही. त्याचा राग समिती कल्याण-डोंबिवली महापालिकेवर काढत आहे. बेकायदा बांधकामांना नोटिसा देण्यासाठी महापौर काही सरपंच नाही. संघर्ष समिती वड्याचे तेल वांग्यावर काढत असल्याचा टोला महापौर राजेंद्र देवळेकर यांनी लगावला आहे. त्याचवेळी उद्यापासून आशेळे गावापासून बेकायदा बांधकामांवरील कारवाई केडीएमसी सुरू करणार असल्याने संघर्ष अटळ आहे.२७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी १० गावांकरिता एमएमआरडीएचे नियोजन प्राधिकरण राहणार असून उर्वरित १७ गावांकरिता केडीएमसी नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याची अधिसूचना राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने अलीकडेच काढली. त्यामुळे २७ गावांत संभ्रमाचे वातावरण तयार झाले. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी मानपाडा मंदिराच्या प्रांगणात २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीची जाहीर सभा झाली. ‘गावात कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तंगड्या तोडू’, असा सज्जड इशारा समितीने दिला आहे. यासंदर्भात महापौर देवळेकर यांनी सांगितले की, गावांचा विकास व्हावा, गावे पालिकेत समाविष्ट करावीत, हीच शिवसेनेची सुरुवातीपासून भूमिका आहे. नागरिकांच्या विकासासाठी ही गावे १ जून २०१५ रोजी पालिकेत समाविष्ट केली. या गावांच्या प्रभागासह पालिकेची निवडणूक पार पडली. मात्र, गावांच्या नियोजन प्राधिकरणाचा दर्जा एमएमआरडीएकडे होता. त्यामुळे गावांतील बेकायदा बांधकामे तोडण्याची कारवाई पालिकेस करता येत नव्हती. आता राज्य सरकारने अधिसूचना काढून ग्रोथ सेंटरसाठी १० गावांसाठी एमएमआरडीएचे व १७ गावांसाठी पालिकेचे नियोजन प्रधिकरण असेल, असे स्षष्ट केले आहे. १७ गावांतील बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी आता सर्वस्वी पालिकेची असेल. या गावांतील जुुनी बांधकामे तोडली जाणार नाहीत. मात्र, जी बांधकामे विकासाच्या आड येतील, त्यांवर कारवाई करावीच लागेल, ही पालिका प्रशासनाची भूमिका आहे. बेकायदा बांधकामांना परवानगी पालिका प्रशासन व महापौरांनी दिलेली नाही. ग्रामीण भागात जी काही बांधकामे झाली, मग ती बेकायदा अथवा कायदेशीर त्यांना परवानगी ग्रामपंचायतींनी दिली आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समितीच्या नेत्यांचा वैयक्तिक गोंधळ असल्याने त्यांच्या भूमिकेत धरसोडपणा दिसत आहे. ग्रोथ सेंटरला विरोध करायचा असेल तर तो सरकारकडे करावा लागेल. त्याचा पालिकेशी काहीएक संबंध नाही. ग्रोथ सेंटर एमएमआरडीएद्वारे विकसित होणार आहे. २७ गावांत सोयीसुविधा पुरवण्यासाठी पाच वर्षांचा आराखडा पालिकेने तयार केला होता. त्यासाठी सात हजार ५०० कोटी रुपये लागतील, असे सरकारला पालिकेने कळविले होते. ते पॅकेज राज्य सरकारने जाहीर करण्याची मागणी पालिकेने केली होती. किमान ५०० कोटी रुपये तरी गावांच्या विकासासाठी द्यावेत, अशी मागणी देवळेकर यांनी केली आहे.