शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कृती आराखड्यातून डोंबिवलीला बगल

By admin | Updated: April 4, 2016 02:01 IST

देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर असा कलंक ललाटी लागलेल्या डोंबिवली शहराचा राज्यातील १० शहरांमधील प्रदूषण रोखण्याकरिता पर्यावरण मंत्रालयाने तयार

मुरलीधर भवार,  डोंबिवलीदेशातील सर्वाधिक प्रदूषित शहर असा कलंक ललाटी लागलेल्या डोंबिवली शहराचा राज्यातील १० शहरांमधील प्रदूषण रोखण्याकरिता पर्यावरण मंत्रालयाने तयार केलेल्या कृती आराखड्यात समावेश करण्यात आलेला नसल्याबद्दल पर्यावरणप्रेमींच्या वर्तुळात आश्चर्य व खेद व्यक्त करण्यात येत आहे.डोंबिवलीतील औद्योगिक कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न गेली २५ वर्षे गाजत आहे. गतवर्षी याच प्रदूषणामुळे येथे पडलेला हिरवा पाऊस देशभर गाजला होता. याच शहरातील प्रदूषणाकडे काणाडोळा केल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा गाशा गुंडाळण्याचे कठोर आदेश दिले. येथील तलावातील मासे प्रदूषणामुळे मरण पावण्याची घटना घडली आहे. डोंबिवलीमधील प्रदूषणाचे एवढे दाखले असतानाही केवळ १० लाख लोकसंख्येच्या निकषात एकट्या डोंबिवली शहराचा यादीत समावेश करणे अशक्य असल्याने केलेला नाही. कल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरांची एकत्र लोकसंख्या १५ लाखांच्या घरात असून दोन्ही शहरांना प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे.पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी अलीकडेच विधान परिषदेत असे जाहीर केले की, मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद, अमरावती, चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे, नागपूर, नाशिक आणि सोलापूर या शहरांतील प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम आयआयटी पवई आणि निरी या संस्थेला दिले आहे. प्रत्येक शहराच्या कृती आराखड्यासाठी ७५ लाख रुपये खर्च येणार आहे. १० शहरांच्या कृती आराखड्याकरिता ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या शहरांची लोकसंख्या १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्याचाच या योजनेत समावेश आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याने तयार केलेल्या अहवालानुसार २००९ साली डोंबिवली शहर प्रदूषणात क्रमांक दोनवर होते. देशातील प्रदूषित शहरांत डोंबिवलीचा क्रमांक १४ वा होता. २०१० साली केंद्रीय पर्यावरण खात्याच्या यादीतही डोंबिवली प्रदूषणात अव्वल राहिली. गेली दोन वर्षे डोंबिवली औद्योगिक वसाहतीत हिरवा पाऊस पडला होता. ‘वनशक्ती’ या संंस्थेने हाती घेतलेल्या ‘सेव्ह उल्हास रिव्हर’ या प्रकल्पांतर्गत डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील रासायनिक कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नाही, ही बाब राष्ट्रीय हरित लवादाकडील याचिकेत नमूद केली. डोंबिवली औद्योगिक कारखान्यांतून प्रदूषण होत असल्याचे केंद्रीय हरित लवादाने मान्य करीत दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण मंडळच बंद करण्याचा आदेश दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचार सभेत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रदूषण दूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना याचा सोयीस्कर विसर पडल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.