अंबरनाथ : रेल्वे डब्यांमध्ये बेकायदा पोस्टर चिकटवून जाहिरातबाजी करणाºया १५ जणांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २५ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढेही धडक कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सुरक्षा दलाचे निरीक्षक एस.पी. सिंह यांनी दिली.गेल्या काही महिन्यांपासून लोेकलच्या डब्यांमध्ये बेकायदा पोस्टर चिकटवून जाहिरातबाजी करण्याचे प्रकार वाढले आहेत. याची दखल घेऊन सिंह व त्यांच्या पथकाने डब्यांमध्ये अशा प्रकारे बेकायदा जाहिरातबाजी करणाºयांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत मे महिन्यापासून आतापर्यंत १५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये पर्सनल लोन धमाका पोस्टर चिकटवणाºया नालासोपारा येथील व्यक्तीकडून १२ हजार तर बदलापूरमधील व्यक्तीकडून दोन हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला. इतर ११ जणांकडून प्रत्येकी १ हजाराप्रमाणे ११ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. त्याशिवाय दोघांचा शोध सुरू असून लवकरच त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे सिंह यांनी सांगितले.
बेकायदा जाहिरातदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:41 IST