शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंग परवानगीबद्दल पालिकाच दुटप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:52 IST

महापालिकेच्या जागेत कंत्राट दिलेल्या होर्डिंगवर आचारसंहिता असतानाही राजकीय बॅनर लावण्यासाठी परवानगीची गरज नाही असा दावा पालिका अधिकाºयांनी केला आहे.

मीरा रोड : महापालिकेच्या जागेत कंत्राट दिलेल्या होर्डिंगवर आचारसंहिता असतानाही राजकीय बॅनर लावण्यासाठी परवानगीची गरज नाही असा दावा पालिका अधिकाºयांनी केला आहे. मात्र होर्डिंगसाठी प्रभाग अधिकारी, पोलीस यांच्या परवानगीची गरज असल्याचा फलक मुख्यालयात लावण्यात आला आहे. यामुळे परवानगीबद्दल पालिकाच दुटप्पीपणा करत असल्याचे बोलले जात आहे.आचारसंहिता लागू असताना परवानगी न घेताच सत्ताधारी भाजपाचे बॅनर पालिका जागेतील कंत्राटदारांच्या हॉर्डिंगवर लागल्याने सर्वच पक्षांनी होर्डिंगसह उपायुक्त दीपक पुजारी, विभागप्रमुख संजय दोंदे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी पुजारी व दोंदे यांनी कंत्राटदाराने पालिकेला माहिती द्यावी. आचारसंहिता असली तरी राजकीय प्रचाराच्या जाहिरातीसाठी पालिकेच्या परवानगीची गरज नसल्याचा दावा केला होता.पालिका मुख्यालयात लावलेल्या विविध परवानगीबाबतच्या फलकावर मात्र होर्डिंगसाठी स्थानिक प्रभाग अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना कळवण्यासह आयोगाच्या १९९५ च्या पत्राचे पालन करण्यास सांगितले आहे. शिवाय मुद्रक, प्रकाशकाचे नाव व परवानगीचा उल्लेख करण्यास सांगितले असले तरी मुद्रक, प्रकाशक यांचा पत्ता मात्र होर्डिंगवर टाकलेलाच नाही.आदित्य अ‍ॅडव्हटायझिंग, दीपलक्ष्मी व सरस्वती अ‍ॅडव्हटायझिंग या कंत्राटदारांनी राजकीय प्रचारासाठी होर्डिंग दिले असले तरी पालिकेला दिलेल्या तिघांच्याही पत्रावर तारखेत खाडाखोड करून २१ अशी समान तारीख टाकली आहे. यावरून भाजपाच्या बेकायदा फलकांना पाठीशी घालण्यासाठी पालिकेने हा खटाटोप केल्याचा आरोप सुलतान पटेल यांनी केला आहे.