शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

आबासाहेब हे तर दुसरे लोकमान्य

By admin | Updated: August 29, 2016 04:52 IST

स्वातंत्र्याच्या लढ्याला सामाजिक अधिष्ठान देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी घरातील गणपती घराबाहेर आणला. गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली

डोंबिवली : स्वातंत्र्याच्या लढ्याला सामाजिक अधिष्ठान देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी घरातील गणपती घराबाहेर आणला. गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली. त्याच धर्तीवर संस्कृतीची जपणूक करत ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी डोंबिवलीतील आबासाहेब पटवारी यांनी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा सुरू केली. ती सातासमुद्रापार पोहोचली. त्यामुळे आबासाहेबांचे कार्य हे लोकमान्यांच्या तोडीचे आहे, असे गौरवोद्गार उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी काढले. सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात श्रीपाद वामन ऊर्फ आबासाहेब पटवारी यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ या आत्मचरित्राचे प्रकाशन नाईक यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. तेव्हा ते बोलत होते. या वेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापकीय सदस्य डॉ. अशोक कुकडे, ‘विवेक प्रकाशना’चे मुख्य व्यवस्थापक दिलीप करंबळेकर आणि अमोल पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. खेड्यातून आलेला सामान्य कार्यकर्ताही मोठे काम उभारू शकतो. त्याचा समाजाला उपयोग होऊ शकतो. तसे काम आबासाहेबांनी केले आहे. सामान्य दिसणारे आबासाहेब हे सामान्यातील असामान्य आहेत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडले. त्यामुळे त्यांना लिहिते करणाऱ्याचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी हे पुस्तक लिहिले नसते, तर त्यांच्या आयुष्यात भेटलेली विविध क्षेत्रांतील माणसे आपल्यासमोर आलीच नसती. त्यांच्या पुस्तकाला दोघांची प्रस्तावना लिहिली आहे. त्यापैकी प्राचार्य राम शेवाळकरांनी आधीच प्रस्तावना लिहिल्याने आबासाहेबांवर पुस्तक लिहून पूर्ण करण्याचे बंधन आले, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले.आबासाहेब हे संस्कारांचे मंदिर आहे. अशा मंदिराचा फायदा समाजाला होतो. १९६२ साली जनसंघाची स्थापना झाली, त्यानंतर दोनतीन वर्षांतच आबासाहेब लोकांमधून निवडून जाऊन डोंबिवलीचे नगराध्यक्ष झाले. तेव्हा ते संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरले होते. पुण्यात जसे सार्वजनिक काका असतात, तसे आबासाहेब हे डोंबिवलीतील सार्वजनिक आबासाहेब आहेत, असे सांगत नाईक यांनी त्यांच्या विविध क्षेत्रांतील सामाजिक कामांचा उल्लेख केला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा ध्येयपूजक आहे, व्यक्तिपूजक नाही. त्या चौकटीत राहून पटवारी यांचे काम विचारधारेचे प्रतिनिधित्व रुजवणारे आहे. पटवारी यांचे हे ‘सहस्रचंद्रदर्शन’ नसून ‘सहस्रगुणदर्शन’ आहे, असे कौतुक करत डॉ. कुकडे यांनी पटवारी यांचे कार्य हे हिंदू नवजागरण असल्याकडे लक्ष वेधले. अमरावतीच्या खोपपूर गावापासून ठाणे, डोंबिवली हा आबासाहेबांचा प्रवास थक्क करणारा आहे. तो शब्दबद्ध करण्याचा अनुभव आनंददायी असल्याचे साहित्यिका सुलभा कोरे म्हणाल्या. आबासाहेब ही चालतीबोलती संस्था आहे. त्यांचा आशीर्वाद लाभल्यानेच राजकीय आणि सामाजिक जीवनात चांगली वाटचाल करता आली, अशी भावना राज्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)