शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या डोंगरी येथील दगडी भिंत रस्त्यावर कोसळली 

By धीरज परब | Updated: June 29, 2023 18:36 IST

भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथील मोठी दगडी भिंत हि पाऊस आणि वाऱ्याने कोसळून मुख्य रस्त्यावर पडली.

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथील मोठी दगडी भिंत हि पाऊस आणि वाऱ्याने कोसळून मुख्य रस्त्यावर पडली.  त्यामुळे वाहन व पादचाऱ्यांना धोका निर्माण होऊन अपघाताची भीती व्यक्त होत आहे. डोंगरी खदान - आईस फॅक्ट्री जवळ मुख्य रस्त्यावर खाजगी जागा असून त्या ठिकाणी दगडे रचून मोठी लांब भिंत उभारलेली आहे. सदर दगडी भिंत हि पक्की नसल्याने रस्त्यावर कोसळण्याचा नेहमीच धोका होता. त्यामुळे तत्कालीन नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी सदर भिंत काँक्रीटची पक्की बांधावी म्हणून मागणी केली होती. 

बुधवारी रात्री उशिरा सदर मोठी दगडी भिंत दोन ठिकाणी कोसळून दगड रस्त्यावर आले . सदर रस्ता अरुंद असून वाहने भरधाव असतात. त्यामुळे वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून पादचाऱ्यांना देखील येथून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. जमीन मालकाने पक्की भिंत न बांधता केवळ दगडे रचून असुरक्षितपणे भिंत उभारली व ती पडून दगड रस्त्यावर आल्याने तात्काळ जमीन मालका कडून पक्की भिंत उभारून घ्यावी अन्यथा लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेmira roadमीरा रोड