शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

८ महिन्यात ८२ स्कूल वाहनांचे परवाने रद्द

By admin | Updated: January 9, 2017 06:07 IST

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण आरटीओ कार्यालयाने आठ

मुरलीधर भवार / कल्याणशालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण आरटीओ कार्यालयाने आठ महिन्यांत ८२ वाहनांची नोंदणी रद्द केली. त्यांचा शालेय वाहतुकीचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आरटीओने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, वाहनांना पिवळा रंग, तपकिरी रंगाची पट्टी तसेच शाळेच्या नावाचा उल्लेख असणे बंधनकारक आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांना दप्तर ठेवण्यासाठी रॅक, तर आसनावर बसल्यावर धरण्यासाठी हॅण्डल हवे. पूर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनात महिला अटेंडण्ट हवी. प्रथमोपचारपेटी, आगरोधक यंत्रणा हवी. वाहनचालकास पाच वर्षांचा अनुभव हवा. बसला लहान विद्यार्थ्यांकरिता चढण्याकरिता सोयीची पायरी हवी. शालेय विद्यार्थी वाहतुकीची सुरक्षितता जोपासण्यासाठी कल्याण आरटीओ कार्यालयाने एप्रिल ते डिसेंबर २०१६ दरम्यान २७७ शालेय वाहनांची तपासणी केली. त्यापैकी ८२ वाहनांमध्ये उपरोक्त नियमावलीतील अनेक त्रुटी आढळल्या. त्यामुळे त्यांची नोंदणी रद्द केली आहे. तसेच त्यांच्याकडून ११ लाख ५३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई आरटीओ कार्यालयाने कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर परिसरात केली आहे. कल्याण आरटीओ क्षेत्रात शालेय वाहनांची संख्या एक हजार ५०० इतकी आहे.