शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

थेंबथेंब वाचवणारा ८१ वर्षांचा व्रतस्थ जलदूत

By admin | Updated: May 28, 2016 02:47 IST

‘पाणी म्हणजे जीवन - पाणी वाचवा’ हे उपदेश नेहमीच आपण ऐकतो. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य असतो. प्रत्यक्षात पाण्याचा थेंब वाचवण्यासाठी कळतनकळत आपण उदासीनच असतो.

- धीरज परब,  मीरा रोड

‘पाणी म्हणजे जीवन - पाणी वाचवा’ हे उपदेश नेहमीच आपण ऐकतो. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य असतो. प्रत्यक्षात पाण्याचा थेंब वाचवण्यासाठी कळतनकळत आपण उदासीनच असतो. पण, वयाच्या ८१ व्या वर्षीदेखील पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब वाचवण्यासाठी धडपडणारे आबीद सुरती यांचे कार्य जलक्रांती घडवणारेच आहे. सुरतींचा जन्म ५ मे १९३५ रोजी गुजरातला झाला. १९६५ मध्ये त्यांची तुुटेला फरिश्ता ही गुजरातीमधील पहिली कादंबरी प्रकाशित झाली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्या, लघुकथा, लहान मुलांची कॉमिक, कार्टुन प्रकाशित झाली आहेत. तिसरी आँख या लघुकथेसाठी त्यांना १९९३ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. चित्रकार, लेखक, साहित्यिक असलेल्या सुरती यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. २००७ पासून आबीद यांनी ड्रॉप डेड फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची मोहीम व जनजागृती सुरू केली आणि त्यांच्या या कार्याची दखल विविध स्तरावर मोठ्या प्रमाणात घेतली जाऊ लागली. हंडाभर पाण्यासाठी रांगेत ताटकळणारी आपली आई, ते राहत असलेल्या मीरा रोड परिसरात नेहमीच भेडसावणारी पाणीटंचाई, त्यातच मित्रांकडे गळणारा नळ पाहून आबीद अस्वस्थ होत. पाण्याचा थेंब गळतोय म्हणून सर्वसामान्यांचे त्याकडे होत असलेले दुर्लक्ष त्यांना नेहमीच सलत होते. यातूनच ड्रॉप डेड फाउंडेशन स्थापन झाली. ड्रॉप डेड फाउंडेशनच्या माध्यमातून फेब्रुवारी २००७ पासून आबीद यांनी स्वत: मीरा रोड परिसरातील घराघरांत जाऊन गळके नळ विनामूल्य दुरुस्त करून देण्याची मोहीम हाती घेतली. थेंबथेंब करून महिन्याला असे एका गळतीद्वारे हजारो लीटर शुद्ध पाणी वाया जाते. पहिल्याच वर्षात आबीद यांनी मीरा रोडमधील १ हजार ६६६ घरांना भेटी दिल्या. त्यात ४१४ गळके नळ त्यांनी विनामूल्य दुरुस्त केले. आजही प्रत्येक रविवारीते सोबत प्लम्बर घेऊन घरोघरी जातात. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी हजारो नळांची दुरुस्ती करून लाखो लीटर पाणी वाचवले आहे. किंगखान शाहरूख खान यानेदेखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. नळांची गळती बंद करून पाणी वाचवण्यावरच आबीद थांबले नाहीत. पाणीबचतीसाठी व्यापक लोकसहभाग व जनजागृती आवश्यक असल्याची त्यांना कल्पना आहे. याबाबत जनजागृती करण्यातकरीता एक मिनिटांची लघुफिल्म बनवण्याची स्पर्धा ठेवली. परीक्षक म्हणून काम करण्यास अमोल गुप्ते, जुही चावला, शेखर कपूर यांच्यासारखे दिग्गज या मोहिमेसाठी तयार झाले. प्रार्थनास्थळांमध्ये पोस्टर मोहीमपाणीबचतीसाठी आता मशिदी व मंदिरांत पोस्टर मोहिमेची तयारी सुरू आहे. मोहम्मद साहेब यांनी पाण्याचे विशद केलेले महत्त्व पोस्टरच्या माध्यमातून प्रत्येक मशिदीमध्ये झळकेल. केवळ मुंबई वा देशातीलच नव्हे तर जगभरातील मशिदीमध्ये पाण्याचे महत्त्व सांगणारे व बचतीचे आवाहन करणारे पोस्टर लावण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.