शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

८१ वर्षीय आजोबा वर्षभराने परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:36 IST

पत्नीच्या निधनानंतर बेपत्ता होणारे ८१ वर्षीय गोंविद वडार हे वर्षभरानंतर अखेर घरी परतले. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात बेवारस म्हणून उपचार सुरू असताना

ठाणे : पत्नीच्या निधनानंतर बेपत्ता होणारे ८१ वर्षीय गोंविद वडार हे वर्षभरानंतर अखेर घरी परतले. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात बेवारस म्हणून उपचार सुरू असताना, त्यांच्याकडून मिळालेल्या ‘नेर्ले’ गावाच्या नावावरून त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले.वडार यांना ५ जुलै २०१७ रोजी वर्तकनगर परिसरातून काही लोकांनी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. वडार यांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले असून, अल्सरसह त्यांना ऐकायला येत नव्हते. विस्मरणचाही आजार होता. नीट बोलता येत नव्हते. याचदरम्यान, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रेखा गजलवार आणि डॉ. खुशबू चौहान व डॉ. कालिंदी कांबळे यांनी उपचार केले. उपचाराला प्रतिसाद देऊ लागल्यावर त्यांची देखरेख करणाºया शिल्पा कचरे, प्रतिभा भोईर, श्रीमती महाजन, शिवानी देशमुख, समाजसेवा अधीक्षक श्रीरंग सिद आणि धनंजय पारखे यांनी विचारपूस केली. त्यावेळी वडार यांनी आपले नाव आणि नेर्ले असे गावाचे नाव सांगितले. त्यानुसार, नेर्ले या गावाचा शोध इंटरनेटवर घेण्यास सुरुवात केल्यावर सांगली, सातारा, सिंधूदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नेर्ले गाव असल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा रुग्णालय प्रशासनासमोर अचडण उभी राहिली. याचदरम्यान, वडार यांच्याकडे आणखी विचारपूस केल्यावर त्यांनी त्यांच्या चुलतभावाचे नाव सांगितले. त्यावेळी ते सांगलीकर असल्याचे समोर आले. त्यानुसार, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांची माहिती दिली. नुकतेच त्यांचा मुलगा अरुण वडार यांनी त्यांना घरी नेले.