शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकर वसुलीचे ५०० कोटींचे लक्ष्य

By admin | Updated: April 4, 2016 01:58 IST

शहरातील मालमत्तांच्या जीआयएस सर्व्हेची कल्पना अपयशी ठरल्यानंतर आता पुन्हा मालमत्ता कर विभागाच्या खाजगीकरणाचा घाट पालिकेने घातला आहे

ठाणे : शहरातील मालमत्तांच्या जीआयएस सर्व्हेची कल्पना अपयशी ठरल्यानंतर आता पुन्हा मालमत्ता कर विभागाच्या खाजगीकरणाचा घाट पालिकेने घातला आहे. मालमत्तांचा सर्व्हे करणे आणि त्यांच्याकडूनच मालमत्ताकराची वसुली करण्याचे काम खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापूर्वी खाजगीकरणाचा फसलेला प्रयोग अजूनही विस्मृतीत गेला नसताना पुन्हा खाजगीकरणाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प पीपीपीच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कोट्यवधींचा खर्च करून शहरातील मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे केला गेला. तो अपयशी ठरल्याची कबुली आयुक्तांनी दिली आहे. शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तांचा खाजगी संस्थेमार्फत नव्याने सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हीच संस्था मालमत्ता करवसुलीचेही काम करणार आहे. तीन प्रकारच्या मालमत्तांचा सर्व्हे केला जाणार असून यामध्ये निवासी, निवासी मालमत्तेचे व्यापारी मालमत्तेत केलेले परिवर्तन आणि व्यापारी यांचा समावेश आहे. यामाध्यमातून शहरात नेमक्या कोणत्या व किती मालमत्ता आहेत, त्यापैकी किती मालमत्ताधारकांनी चुकीची माहिती देऊन पालिकेचे उत्पन्न बुडवले आहे, याची माहिती होणार आहे. सर्व्हे व सक्त वसुलीमुळे पालिकेचे उत्पन्न ५०० कोटींच्या वर जाईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. हे काम करणाऱ्या खाजगी संस्थेला उत्पन्नातील काही हिस्सा दिला जाणार आहे.