शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

५०० कोटी रुपयांचा घोटाळा

By admin | Updated: January 14, 2017 06:16 IST

मीरा रोड आणि काशिमीरा येथील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींवर आरोप निश्चितीसाठी

ठाणे : मीरा रोड आणि काशिमीरा येथील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींवर आरोप निश्चितीसाठी तसेच यातील गुन्हा शाबितीसाठी भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी ठाणे पोलिसांनी अमेरिकन न्यायालयामार्फत संबंधित पीडितांचे जबाब मिळवून देण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे. ठाणे न्यायालयाने हे पत्र आता अमेरिकन न्यायालयाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ इतकी रक्कम उकळल्याचे ७४ पैकी सात जणांच्या चौकशीत उघड झाले आहे. त्यांनी बनवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सखोल पडताळणीमध्ये ही माहिती उघड झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने ठाणे न्यायालयात सांगितले.संपूर्ण देशातच नव्हे तर अमेरिकेतही खळबळ उडवून देणाऱ्या या फसवणुकीच्या तपासातील एकेक धागा उलगडण्यासाठी पोलिसांना आता यातील अमेरिकेतील पीडितांचाही शोध घ्यावा लागत आहे. त्यासाठी काशिमीरा आणि मीरा रोड येथील कॉल सेंटरमध्ये मिळालेल्या संगणक तसेच हार्ड डिस्कमधील डेटाद्वारे फसवणूक झालेल्यांचे जबाब नोंदवणे, त्यांच्याकडून माहिती घेणे, हे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे हार्ड डिस्कमधील संबंधित अमेरिकन नागरिकांचा आवाज आणि ठिकाणाचा शोध घेऊन त्याचा जबाब नोंदवण्यासाठी अमेरिकन पोलिसांची मदत मोलाची ठरणार आहे. अमेरिकन न्यायालयाने तसे आदेश तेथील पोलिसांना दिले आहेत. पीडितांचे जबाब नोंदवून घेण्याची विनंती ठाणे न्यायालयामार्फत अमेरिकन न्यायालयाला ठाणे पोलिसांनी केल्याचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले. या प्रक्रियेसाठी ठाणे न्यायालयाने अमेरिकन न्यायालयाला एलआर अर्थात लेटर रोगेटरी पाठवले आहे. त्याद्वारे या कोट्यवधी डॉलर घोटाळ्यातील पीडितांचे आवाज आणि जबाब नोंदवणे सुलभ होणार असल्याचेही मणेरे यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे ५० पीडितांची फसवणूक झाल्याचे हार्ड डिस्कद्वारे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)