शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

४५० एमएलडी पाणी बेपत्ता

By admin | Updated: May 15, 2016 03:53 IST

जीवघेण्या पाणीटंचाईच्या काळात आठवड्यातून केवळ पाच दिवस पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांकडूनच मनमानीपणे ४५६ दशलक्ष लीटर पाण्याचा अपव्यय केला जात

सुरेश लोखंडे , ठाणेजीवघेण्या पाणीटंचाईच्या काळात आठवड्यातून केवळ पाच दिवस पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांकडूनच मनमानीपणे ४५६ दशलक्ष लीटर पाण्याचा अपव्यय केला जात असल्याचे सहा दिवसांच्या पाणीपुरवठा अहवालाद्वारे उघड झाले आहे. हे नेमके गेले कुठे, याचा हिशेबच मिळत नाही.‘जल निर्जल तैसे... वापरावे अमृत जैसे!’ या संत महात्म्यांच्या तत्कालीन वाक्याची तंतोतंत अनुभूती येत आहे. पाण्याचा वापर करताना सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. एक दिवसाआड येणाऱ्या पाण्याची ‘चातका’प्रमाणे गृहिणी वाट पाहत असतात. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्यांनी आता विविध उपाय हाती घेतले. मात्र पुरवठा करणाऱ्या यंत्रणांकडून पाण्याच्या बचतीसह चोरी, गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचे आढळले. ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांना बारवी धरणासह आंध्रा धरणातील पाणी उल्हास नदीद्वारे पुरवले जात आहे. ६ ते ११ मे या सहा दिवसांच्या कालावधीत बारवी धरणातून दोन हजार ९५० दशलक्ष लीटर व तीन हजार २५९ दशलक्ष लीटर पाणी आंध्रातून उचलण्यात आले आहे. या सहा हजार २०९ दशलक्ष लीटर पाण्याचा वापर एमआयडीसी, स्टेम, केडीएमसी आणि एमजेपी या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी केला आहे. जिल्ह्यातील या चार यंत्रणांनी सात दिवसांत पाच हजार ७५३.२५० दशलक्ष लीटर पाण्याचे वितरण केले आहे. परंतु, धरणातून उचललेल्या आणि या यंत्रणांनी वितरीत केलेल्या पाण्याच्या हिशेबामध्ये मोठी तफावत आढळून आल्यामुळे नक्कीच पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.