शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणपुढे ४३६ कोटींच्या वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कृषिपंप ग्राहक वगळता, इतर सर्व वीज ग्राहकांकडून त्यांच्या चालू वीजबिलासह थकबाकीचे एकूण ९९२ कोटी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कृषिपंप ग्राहक वगळता, इतर सर्व वीज ग्राहकांकडून त्यांच्या चालू वीजबिलासह थकबाकीचे एकूण ९९२ कोटी रुपये मार्चअखेरपर्यंत वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे, परंतु मार्चचे शेवटचे १० दिवस शिल्लक असताना ४३६ कोटी रुपयांची वसुली बाकी आहे. यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारीतील आठ लाख ८० हजार ग्राहक असून, त्यांच्याकडे ३७५ कोटींचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही वसुली मोहीम आणि अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. वीज ग्राहकांनी वसुली मोहिमेत सहकार्य करावे व भरणा केंद्रात वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या कल्याण कार्यालयांतर्गत सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू आहे. साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मोहीम व त्यासोबतच महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू आहेत. परिमंडळातील वीज ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

कल्याण परिमंडळांतर्गत कल्याण एक आणि दोन, वसई आणि पालघर या चार मंडळात सर्व वर्गवारीतील जवळपास २६ लाख वीज ग्राहक आहेत. १९ मार्चपर्यंत कल्याण परिमंडळातील सात लाख ५८ हजार ग्राहकांनी त्यांच्या १५२ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमाद्वारे केला आहे. कोरोनाचा पुन्हा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन वीज ग्राहकांनी डिजिटल माध्यमाद्वारे घरबसल्या वीजबिल भरावे व सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

------------------------