शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरात ३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:43 IST

ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त ...

ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांचे वेळेत लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात ३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, चार खासगी रुग्णालयांतही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरात साेमवारी पाच लसीकरण केंद्रांवर महिलांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात आली होती.

महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसोबत खासगी हॉस्पिटलचादेखील लसीकरण मोहिमेत समावेश केला आहे. यामध्ये महापालिकेच्यावतीने शहरात ३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी लाभार्थ्यांना वेळेत लस मिळावी, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चार खासगी हॉस्पिटलमध्येदेखील लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. महापालिकेच्यावतीने ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पोस्टकोविड सेंटर, मेंटल हॉस्पिटल, कौसा हॉस्पिटल, हाजुरी, सह्याद्री, आंबेडकर भवन, वाडिया, किसननगर, रोसा गार्डेनिया, कौसा आरोग्य केंद्र, कोपरी मॅटर्निटी, अतकोनेश्वर आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर, आझादनगर आरोग्य केंद्र, बाळकूम आरोग्य केंद्र, सी. आर. वाडिया आरोग्य केंद्र, गांधीनगर, कळवा, कौसा आरोग्य केंद्र, किसननगर, लक्ष्मी चिरागनगर आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरेस आरोग्य केंद्र, माजिवडा आरोग्य केंद्र, मनोरमानगर, मानपाडा, नौपाडा, शीळ आरोग्य केंद्र, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, सावरकरनगर आरोग्य केंद्र, आनंदनगर आरोग्य केंद्र, आदी ठिकाणांचा समावेश आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये सिद्धिविनायक रुग्णालय, वेदांत हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, काळसेकर रुग्णालय, प्राइम होरायझन हॉस्पिटल, हायवे हॉस्पिटल, पिनॅकल ऑर्थोकेअर हॉस्पिटल, हाईलँड हॉस्पिटल, कौशल्य रुग्णालय, आदींचा समावेश आहे.

...............

महिलांसाठी विशेष सुविधा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी पाच लसीकरण केंद्रांवर महिलांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात आली होती. यामध्ये सी. आर. वाडिया, किसननगर आरोग्य केंद्र, लोकमान्य आरोग्य केंद्र, कोरस, रोझा गार्डिनिया, कौसा आरोग्य केंद्र, आदींचा समावेश होता.