शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

३६९३ इमारतीतील रहिवासी बेघर होण्याची भीती

By admin | Updated: May 23, 2017 01:43 IST

ठाण्यासह नव्या शासन निर्णयानुसार अनधिकृत आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी जागा देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यासह नव्या शासन निर्णयानुसार अनधिकृत आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी जागा देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आता याच निर्णयाचा आधार घेऊन पावसाळ्यापूर्वी अशा प्रकारे इमारती खाली करुन त्या पाडण्याची कारवाई ठाणे महापालिका सुरु करणार आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण केला आहे. यामध्ये ३६९३ या इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सी -१ अर्थात अतिधोकादायक इमारतींची संख्या ही ६९ एवढी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या २० ने कमी झाली आहे. त्यानुसार आता या इमारती रिकाम्या करुन त्या तत्काळ तोडण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.गेल्या वर्षी पालिकेने शासनाच्या नव्या धोरणानुसार सर्व्हे केला असता, शहरात ३ हजार ६११ धोकादायक आणि ८९ अतिधोकादायक इमारती ठरल्या होत्या. ठामपाच्या सर्व्हेत शहरात ३ हजार ६९३ धोकादायक आणि ६९ अतिधोकादायक इमारती आहेत. नव्या धोरणानुसार अतिधोकादायक, राहण्या अयोग्य व तत्काळ निष्कासित करणे अशा सी - १ प्रकारामध्ये शहरातील एकूण ६९ इमारतींचा समावेश असून यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३२ इमारती या नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत असल्याची माहितीही या सर्व्हेतून समोर आली आहे. त्याखाली मुंब्रा प्रभाग समितीमध्ये १०, उथळसर आणि कोपरी प्रत्येकी ०७, वर्तकनगर, माजिवडा- मानपाडा प्रत्येकी ०४, कळवा ०२ अशी संख्या असतांना वागळे आणि लोकमान्यनगर सारख्या गजबजलेल्या भागात एकही इमारत अतिधोकादायक नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर सी २ ए प्रकारात (इमारती रिकाम्या करुन संरचनात्मक दुरुस्ती करणे) ९१.सी २ बी प्रकारात (इमारती रिकाम्या न करता रचनात्मक दुरुस्ती) १६६४.सी ३ प्रकारात (इमारतींची किरकोळ दुरुस्ती) १८६९ एवढी संख्या आहे.