शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून दुसºया दिवशीही बसचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:47 IST

कल्याण : रेल्वे समांतर रस्त्यावरून सोमवारपासून सुरू झालेल्या कल्याण-डोंबिवली बसचे श्रेय लाटण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने फलकबाजी केली. त्यात केडीएमसीचेच प्लास्टिक मुक्तीचे आवाहन करणारे फलकही झाकोळले गेले. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध होताच तो फलक तत्काळ हटवण्यात आला. दरम्यान, सोमवारी भाजपाच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनी बसचे स्वागत केल्यानंतर मंगळवारीही भाजपाच्या अन्य ...

कल्याण : रेल्वे समांतर रस्त्यावरून सोमवारपासून सुरू झालेल्या कल्याण-डोंबिवली बसचे श्रेय लाटण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने फलकबाजी केली. त्यात केडीएमसीचेच प्लास्टिक मुक्तीचे आवाहन करणारे फलकही झाकोळले गेले. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध होताच तो फलक तत्काळ हटवण्यात आला. दरम्यान, सोमवारी भाजपाच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनी बसचे स्वागत केल्यानंतर मंगळवारीही भाजपाच्या अन्य नगरसेवकांनी स्वतंत्रपणे स्वगात केले. मात्र, बस उशिराने आल्याने त्यांनी सभापती संजय पावशे यांच्याकडे नाराजीही व्यक्त केली.सोमवारपासून समांतर रस्त्यावरून केडीएमटीच्या बस धावू लागल्या. शिवसेनेचे परिवहन सदस्य मनोज चौधरी आणि भाजपाच्या स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्यात मात्र बस सुरू करण्यावरून श्रेयवाद चांगलाच रंगला आहे. त्याची प्रचिती जागोजागी लागलेल्या फलकबाजीतून आली. दरम्यान, मनोज चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या फलकामुळे तर कचोरी टेकडी येथे लावलेले प्लास्टीक मुक्तीचे होर्डिंग्जही झाकले गेल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाले. याची तत्काळ दखल घेत तो फलक तेथून हटवण्यात आला. त्यामुळे प्लास्टिक मुक्ती आवाहनाचा होर्डिंग्ज पुन्हा दिसू लागला.प्रतीक्षा, स्वागत आणि सभापतींना टोलासोमवारपासून बसला या मार्गावरून चालवण्यास प्रारंभ झाला असलातरी काही दिवस फारशा फेºया येथून होणार नसल्याचे उपक्रमाने स्पष्ट केले आहे. ज्या रिकाम्या बस आगाराकडे जातात, त्याच सुरुवातीला या मार्गावरून चालवण्यात येतील. वाढत्या प्रतिसादावर फेºया वाढवण्यात येतील, असे स्पष्टीकरण आले.दरम्यान, सोमवारी भाजपाच्या नगरसेविका चौधरी यांनी बसचे स्वागत केले असताना मंगळवारीही मार्गावरून धावणाºया बसचे भाजपाच्या नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी स्वतंत्रपणे स्वागत केले. सकाळी ११.२५ ला ‘बालाजी आंगण’ संकुल येथे येणाºया बसचे स्वागत करण्यासाठी नगरसेवक साई शेलार, निलेश म्हात्रे, विनोद काळण, राजन आभाळे तसेच भाजपाचे परिवहन समिती सदस्य प्रसाद माळी, शशिकांत कांबळे हे वाट पाहत उभे होते. मात्र ही बस न आल्याने त्यांनी शिवसेनेचे सभापती संजय पावशे यांना मोबाइल करून नाराजी व्यक्त केली. परंतु, तब्बल दोन तास उशिराने दाखल बस दाखल झाली खरी पण ती घेऊन येण्याची नामुष्की सभापती पावशेंवर ओढावली. स्वागतासाठी परिवहन सभापती रिकामी बस घेऊन आले, असा टोला लगावत उपस्थित नगरसेवकांनी बसचे स्वागत केलेच तसेच पुष्पगुच्छ देऊन सभापतींचेही उपरोधिकपणे आभार मानले. बसचे स्वागत करण्यात येणार आहे, याची कल्पना अगोदरच दिली असती तर पहिलेच नियोजन केले असते, अशी प्रतिक्रिया पावशे यांनी त्यांना दिली.