शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

धान्य महोत्सवात २५ टन धान्यविक्री

By admin | Updated: May 6, 2017 05:54 IST

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने गावदेवी मैदानात आयोजिलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने गावदेवी मैदानात आयोजिलेल्या धान्य महोत्सवाला ठाणेकर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून ४ दिवसांत सुमारे २५ टन धान्याची विक्री झाली असून त्यातून जवळपास १० ते १२ लाखांची उलाढाल झाली आहे.नाम फाउंडेशन व संस्कार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा धान्य महोत्सव १ ते ४ मे दरम्यान आयोजिला होता. गुरुवारी या धान्य महोत्सवाचा समारोप झाला. हिंगोली, बीड जिल्ह्यांतील जवळपास १०० शेतकऱ्यांनी येथे धान्य विक्रीसाठी आणले होते. गहू, तांदूळ, तूरडाळ, मूगडाळ, ज्वारी, चवळी, सेंद्रिय हळद, मसाले आदी विविध धान्य, कडधान्य विक्र ीसाठी ठेवले होते. यात गव्हाची सुमारे ७ ते ८ टन, तूरडाळ ५ ते ६ टन, ज्वारी ६ ते ७ टन, मूगडाळीची २ ते ३ टन इतकी विक्र ी झाल्याचे नामच्या मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. नाम आणि संस्कार यांच्या सहकार्यामुळे आम्ही कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय आमचा माल विकू शकलो. यापुढेही पुन्हा असा महोत्सव आयोजित केल्यास आम्ही तेथेही आमचे धान्य विक्रीसाठी आणू, अशा शब्दांत सहभागी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. महोत्सवात सहभागी झालेला आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी कृषी महाराष्ट्रभूषण हा राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेल्या शिवराम बोडके या तरुण शेतकऱ्याने सर्वांच्या वतीने नाम आणि संस्कार संस्थेचे आभार मानले. या वेळी संस्कार संस्थेचे अध्यक्ष आ. संजय केळकर, अमोल गोऱ्हे उपस्थित होते.शनिवार ६ ते १० मे पर्यंत धान्य महोत्सव माझी आई शाळा, ऋ तू पार्कजवळ, पातलीपाडा, ठाणे (प.) येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत होणार आहे. त्यालाही ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नाम आणि संस्कारच्या वतीने करण्यात आले आहे.महोत्सवाला उत्तम प्रतिसादनाम आणि संस्कार यांच्या सहकार्यामुळे आम्ही आमचा माल कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय विकू शकलो. यापुढेही पुन्हा असा महोत्सव आयोजित केल्यास आम्ही त्यातही आमचे धान्य विक्रीसाठी आणू, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.