शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मीरा-भार्इंदरकरांना २४ तास पाण्याचे मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 06:25 IST

मीरा-भार्इंदरला सूर्या प्रकल्पातूनच अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी सात वर्षांपूर्वी सुरू केलेले प्रयत्न पूर्ण होऊन २०१४ मध्ये २४ तास धोधो पाणी मिळणार

राजू काळे/ लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदरला सूर्या प्रकल्पातूनच अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी सात वर्षांपूर्वी सुरू केलेले प्रयत्न पूर्ण होऊन २०१४ मध्ये २४ तास धोधो पाणी मिळणार होते. मात्र, राजकीय साठमाऱ्यांमध्ये हा प्रकल्प रखडल्याने शहरातील नागरिकांची पाण्यासाठीची परवड सुरूच आहे. पालिका प्रशासनाने २०१०-११ मध्ये शहरातील पाण्याची ज्वलंत समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सूर्या धरणातील पाणी शहराकरिता आणण्याची योजना तयार केली. त्यात एमएमआरडीएकडून १०० दशलक्ष लीटर व राज्य सरकारकडून १०० दशलक्ष लीटर अशा २०० एमएलडी पाणीपुरवठ्याचा समावेश होता. ही योजना पालिकेने राबवल्यास त्यासाठी कोट्यवधींचा निधी, अतिरिक्त कर्मचारीवर्ग लागेल व देखभाल-दुरुस्तीच्या खर्चात भरमसाट वाढ होणार होती. ती टाळण्यासाठी प्रशासनाने बीओटी तत्त्वावर योजना राबवण्याचा निर्णय घेतला. याकरिता एकूण चार निविदा प्राप्त झाल्या. त्यातील एका निविदाकाराने बीओटी तत्त्वावर काम करण्यास मान्यता दिली. त्याने ही योजना पूर्ण करण्यासाठी ३० वर्षांच्या कराराने पाण्याचा दर १७ रुपये प्रतिहजार लीटर निश्चित करण्याची मागणी केली. त्याला प्रशासनाने मान्यता दिली. दुसऱ्या निविदाकाराने पालिकेकडे सुरुवातीला १२०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. पालिकेने ती अमान्य करत निविदा रद्द केली. त्यामुळे त्या निविदाकाराने उच्च न्यायालयात धाव घेतली. पालिकेने बीओटी तत्त्वावरील आपल्या योजनेची बाजू न्यायालयात नीट न मांडल्याने न्यायालयाने योजनेलाच स्थगिती दिली. कंत्राटदार कंपन्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून राजकारण्यांनी केलेल्या कटकारस्थानांमुळे बीओटी तत्त्वावरील योजनेला खो बसला. योजना राबवली असती, तर शहराला २०१४ मध्येच २४ तास पाणी उपलब्ध झाले असते. परिणामी, शहराच्या ललाटी लिहिलेला पाणीटंचाईचा शाप कायम राहिला. त्यानंतर, वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीप्रश्न इतका बिकट झाला की, २०१५-१६ मध्ये नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागली. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे २०११ पासून शहरातील नवीन बांधकामांना नळजोडणी देण्यास प्रशासनाने ब्रेक लावला. त्यांची तहान टँकरद्वारे भागवली जात असल्याने टँकरमाफियांचे उखळ पांढरे होण्याची परंपरा टिकून आहे. शहराची लोकसंख्या १३ लाखांच्या जवळपास गेली आहे. वाढत्या लोकसंख्येचा कोरडा पडलेला घसा ओला करण्याकरिता भाजपा नेत्यांनी फडणवीस सरकारच्या मान्यतेने ७५ एमएलडी पाणीपुरवठ्याची योजना राबवली. यामुळे शहराला पूर्वीपेक्षा अधिक पाणी मिळत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा थोडासा अतिरिक्त पाणीपुरवठा सुरू होताच निवडणुकीवर डोळा ठेवून नवीन नळजोडणी देण्यावरील स्थगिती प्रशासनाने उठवली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी २०० ऐवजी २१८ एमएलडी पाणीपुरवठ्याची सूर्या प्रकल्प योजना एमएमआरडीएमार्फत राबवण्याची घोषणा निवडणुकीवर डोळा ठेवून केली. शहराच्या हद्दीवर असलेल्या चेना गावापर्यंत एमएमआरडीए पाणी आणणार असून पुढे ते शहरात आणण्याची जबाबदारी पालिकेची राहणार आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च अपेक्षित आहे. तो पालिकेच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळे पालिकेला एक तर कर्ज काढावे लागेल, अथवा राज्य सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागेल. पालघर जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासींसाठी असलेल्या सूर्या प्रकल्पातील पाणी मीरा-भार्इंदरला देण्यास भाजपाचेच खा. चिंतामण वनगा यांनी विरोध दर्शवला आहे. सध्या पाण्याचा दर प्रतिहजार लीटरमागे १० रुपये असून भविष्यात तो २० ते २५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सूर्याच्या पाण्याचे मृगजळ दाखवून भाजपा एकहाती सत्ता मिळण्याचे स्वप्न पूर्ण करू पाहत असली तरी २०१४ पासून २४ तास पाण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत टंचाईमुळे अश्रू यायचे बाकी आहे. नागरिकांच्या सूचनांवर भाजपाचा जाहीरनामामीरा रोड : भाजपा नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्यानंतर जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. भाजपाने मेरा शहर, मेरा सुझाव असा प्रचार सुरू केला असून जागोजागी सूचनापेट्या ठेवल्या जाणार आहेत. लोकसहभागागून भाजपा जाहीरनामा तयार करणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील समस्या, आवश्यक सुविधा व त्यांना अपेक्षित असलेली विकासकामे याची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. सूचनापेट्यांमधून आलेल्या नागरिकांच्या मागण्या, कल्पनांचा सारासार विचार केला जाणार आहे. या बाबत कार्यालय प्रमुख यशवंत आशिनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही लोकसहभागातून जाहीरनामा करण्याच्या संकल्पनेला दुजोरा दिला. आम्ही आमचा नव्हे तर नागरिकांचा जाहीरनामा मांडणार आहोत असे ते म्हणाले.भाजपाची विनापरवानगी बॅनरबाजी; नव्या वादाला तोंडमीरा रोड : भाजपाने मीरा रोडच्या अनेक भागात पालिका व खाजगी होर्डिंगवर विनापरवानगी जाहिरातींचे फलक लावल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. नियमांचे उल्लंघन करून लावलेल्या या फलकांना महापालिका आयुक्त व उपायुक्तांनी पाठीशी घातल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस, मनसे केला आहे. गुन्हा दाखल न करणाऱ्या अधिकाऱ्यांची थेट केंद्रीय तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. आचारसंहितेनुसार खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर बॅनर लावायचे असल्यास खाजगी जमीन मालकासह महापालिकेची परवानगी घेणेही आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. तर महापालिकेच्या मालकीच्या जागांवर प्रचाराचे बॅनर लावण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे अशा ठिकाणी परवानगी द्यायची असल्यास आयुक्तांनी सर्व उमेदवार व राजकीय पक्षांना समान व न्याय पध्दतीने त्याचे वाटप करण्याची ताकीद राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. कोणत्याही उमेदवार वा पक्षास झुकते माप न देता वाटल्यास सोडत पध्दतीने परवानगी द्यावी असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आॅगस्ट १९९५ च्या अधिसुचनेनुसार फलकावर मुद्रक, प्रकाशकाचा उल्लेख हवा. तर मालमत्ता विरुपण कायद्याचे पालन करण्याचे निर्देश आहेत. शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अनेक होर्डिंगवर भाजपाने प्रचाराचे बॅनर लावल्याने वादंग निर्माण झाला आहे. पालिकेच्या जागेत बहुतांश होर्डिंग असून पालिकेने ते कंत्राटावर दिलेले आहेत. सिल्वर पार्क, सावरकर चौक, भार्इंदर पश्चिम आदी ठिकठिकाणी प्रचाराचे बॅन लावले आहेत. बॅनरवर मुद्रक, प्रकाशक तसेच परवानगीचा क्रमांक टाकणे बंधनकारक असतानाही ते टाकले नव्हते. तक्रारींनंतर मुद्रक म्हणून पप्पू आर्टस् व प्रकाशक म्हणून भाजपा कार्यालयप्रमुख यशवंत आशिनकर यांची नावे चिकटवली आहेत. गुन्हा दाखल करून बॅनर काढण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.आम्ही ५२ ठिकाणी बॅनर लावले असून पालिका कंत्राटदाराकडून रितसर परवानगी घेतली आहे. महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला आहे. पालिकेकडून परवानगी मिळणार आहे. त्याची प्रत अजून मिळालेली नाही. - यशवंत आशिनकर, भाजपा कार्यालय प्रमुख४ ते ५ दिवसांपासून पालिकेची परवानगी नसताना बॅनर लागल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आपण उपायुक्त दीपक पुजारी यांना सर्व माहिती घेऊन बोलावले आहे. आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करु. - डॉ. नरेश गीते, पालिका आयुक्त. आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे. पालिका जर कारवाई करत नसेल तर आयुक्त व संबंधित अधिकारी यांची केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. - प्रताप सरनाईक, आमदार. उपायुक्त पुजारी व विभागप्रमुख दोंदे यांच्या संगनमतानेच आचारसंहिता व कायदे नियम धाब्यावर बसवून भाजपाचे बॅनर लागले आहेत. बॅनर काढून गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पुजारी - दोंदे यांना आयुक्त व निवडणूक आयोगाने तत्काळ निलंबित करावे. - सुलतान पटेल, जगदंब प्रतिष्ठान. आचारसंहितेचे उल्लंघन भाजपा नेत्यांकडूनच सुरू असल्याने लाचार प्रशासन काही कारवाई करणार नाही. निवडणूक आयोगाने सक्षम अधिकारी नियुक्त करावेत. - कृष्णा गुप्ता, सत्यकाम फाउंडेशन. काँग्रेसच्या इच्छुकांसाठी आज २०० गुणांचा मराठीचा पेपर भार्इंदर : पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसमधुन यंदा २३८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यांच्या मुलाखती उद्या १० ते ६ यावेळेत होणार आहेत. मुलाखतींपूर्वी इच्छुकांना २०० गुणांची मराठी भाषेचा लेखी पेपर द्यावा लागणार आहे. काँग्रेसला लागलेली गळती मुझफ्फर हुसेन यांच्या प्रयत्नामुळे रोखण्यात आली असली तरी सेना-भाजपात वाढलेल्या गर्दीला काँग्रेसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेतील किंगमेकर ठरणार असल्याचा दावा केला जात असला तरी अधिकाधिक जागेवर उमेदवार निवडून यावेत, यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. इच्छुकांना मुलाखतीसाठी प्रशासकीय कारभारासह सामान्यज्ञानाच्या अभ्यासाचीही तयारी करावी लागणार आहे. अशी असेल परीक्षापरीक्षा २०० गुणांची असून त्यात एकूण १६ प्रश्नांचा समावेश असेल. पहिले १४ प्रश्न आॅब्जेक्टीव्ह पद्धतीचे तर उर्वरित २ प्रश्न विविध विषयांवर आधारित असतील. परीक्षा मीरा रोड येथील अस्मिता क्लबमध्ये होणार असून त्याचे नियोजन प्रभागनिहाय करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी १० मिनिटांचा वेळ असेल. प्रत्येक प्रभागातील इच्छुकांना वेगवेगळ््या प्रश्नांचा समावेश असलेल्या प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. परीक्षेनंतरच त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांची समितीउत्तरपत्रिका तपासण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. यानंतर होणाऱ्या मुलाखतींसाठी माजी आमदार मुझफ्फर हुसेन, प्रदेश निरीक्षक राजेश शर्मा, मेहुल व्होरा, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, विविध सेलचे अध्यक्ष व प्रदेश पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. मुलाखतींसह परीक्षेचा अहवाल थेट प्रदेश कमिटीला पाठवण्यात येणार आहे. त्यांच्याकडूनच उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. शिवसेनेच्या अंतिम उमेदवारांची यादी १ आॅगस्टला भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्याकरिता शिवसेनेतील ५४० इच्छुकांच्या मुलाखती रविवारी झाल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार उमेदवारांची निवड पारदर्शकपणे होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून थेट पक्षाचे उपनेते रवींद्र मिर्लेकर व विनोद घोसाळकर यांच्यासह त्यांना मदत करण्यासाठी सेनेचे ठाणे जिल्हा सचिव विलास जोशी व ठाणे परिवहन समितीचे सदस्य अनिल भोर यांच्या समितीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. दरम्यान, अंतिम उमेदवारांची यादी १ आॅगस्टला जाहीर होणार आहे, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. सकाळी ९ पासून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. भाजपातून उमेदवारीची आस नसलेल्यांसह इतर पक्षांतून आलेल्यांची संख्या सेनेत वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीचा नाद सोडून शिवबंधन हाती बांधलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा व मनसेच्या इंजिनातून बाहेर पडलेले उपाध्यक्ष अरुण कदम यांच्या सेना प्रवेशामुळे बळ मिळाले आहे. याशिवाय, यंदाच्या निवडणुकीत सेनेचा बाण सत्तेचे अचूक लक्ष्य भेदण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक व रवींद्र फाटक यांची फौज सज्ज झाल्याने सेनेला भाजपाऐवजी ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे बोलले जात आहे. सेनेत वाढलेल्या गर्दीत इच्छुकांचीही तोबा गर्दी असली तरी सर्वांचा सांगोपांग विचार केला जाणार असून पक्षाच्या भवितव्यासाठी योग्य उमेदवाराचीच निवड केली जाणार असल्याचे सेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. सक्षम इच्छुकांच्या उमेदवारीच्या दाव्याला न्याय द्या, असे संकेत थेट ‘मातोश्री’वरून देण्यात आले आहेत. त्यात सेनेच्या निष्ठावंतांसह उमेदवारी देण्याच्या अटीवर इतर पक्षांतून सेनेत प्रवेश मिळवलेल्यांना सामावून घेताना वरिष्ठांना कसरत करावी लागणार आहे. ५४० इच्छुकांमुळे २४ प्रभागांत इच्छुकांची सरासरी संख्या २० ते २२ होती. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.