शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षणाचा २३ हजार ५६ विद्यार्थ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सहा महिन्यांसाठी एक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सहा महिन्यांसाठी एक हजार २०० रुपये प्रोत्साहनपर उपस्थिती भत्ता दिला जात आहे. मात्र, २५ हजार ७२८ पैकी १७ हजार ४३० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेतला आहे, तर फोनद्वारे व गृहभेटद्वारे पाच हजार ६२६ विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. परंतु, दोन हजार ६७२ विद्यार्थी हे संपर्कातच नसल्याने त्यांना यापैकी कोणत्याही योजनाचा लाभ देता आला नसल्याचे ठामपाच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून शाळा संपूर्णपणे बंद आहेत. मनपा शाळांमधील विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल घटकातील असून, त्यांना ऑनलाईन शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, याकरिता सहा महिने एक हजार २०० रुपये प्रोत्साहनपर उपस्थिती भत्ता हा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. परंतु, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने महिन्यातील २० दिवस उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जर, एखादा विद्यार्थी २० दिवसांमधील काही दिवस अनुपस्थित राहिला तर पुढील महिन्यात त्या विद्यार्थ्याचा भत्ता दिला जाणार नाही. या कामासाठी एका शिक्षकावर २० विद्यार्थ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ २५ हजार ७२८ पैकी २३ हजार ५६ विद्यार्थ्यांनी सध्या घेतला आहे. यामध्ये आठ हजार २६८ मुले, तर नऊ हजार १६२ मुली आहेत. तर, फोनद्वारे आणि गृहभेटीद्वारे दोन हजार ८०५ मुले आणि दोन हजार ८२१ मुली शिक्षण घेत आहेत. तर, संपर्कात नसलेल्यांमध्ये एक हजार ४२० मुले आणि एक हजार २५२ मुली आहेत.

---------

ठामपा शाळेतील विद्यार्थ्यांनाही योग्य प्रकारे शिक्षण घेता यावे, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.

- मनीष जोशी, उपायुक्त, शिक्षण विभाग, ठामपा

-----------------