शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पंचम कलानींकडे २३ कोटी ७५ लाख

By admin | Updated: February 17, 2017 01:57 IST

महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांचे शिक्षण बेताचे किंवा ‘अशिक्षित’ या श्रेणीचे आहे. मात्र, त्यांच्याकडील

उल्हासनगर : महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांचे शिक्षण बेताचे किंवा ‘अशिक्षित’ या श्रेणीचे आहे. मात्र, त्यांच्याकडील संपत्तीचे आकडे वाचले, तर डोळे पांढरे होतील. ओमी कलानी यांची पत्नी पंचम या सर्वात धनाढ्य उमेदवार असून त्यांच्याकडे २३ कोटी ७५ लाख रुपयांची माया आहे. मात्र, भाजपाच्या उमेदवार सिमरन वानखेडे यांनी आपल्याकडे शून्य संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रावर जाहीर केले. पंचम यांच्यापाठोपाठ भाजपाचे विजय पाटील यांच्याकडे १८ कोटींची संपत्ती आहे. विद्यमान ४ नगरसेवकांसह १३ उमेदवारांनी आपण अशिक्षित असल्याचे जाहीर केले आहे.उल्हासनगर महापालिकेच्या ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार रिंगणात आहेत. पाच वर्षांपूर्वी ज्यांची संपत्ती लाखांत होती, त्यांची संपत्ती या वेळी कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ४७९ उमेदवारांपैकी ८० टक्के उमेदवार इयत्ता दहावीपेक्षा कमी शिकलेले आहेत. ज्या १३ उमेदवारांनी आपण अशिक्षित असल्याचे कबूल केले आहे, त्यामध्ये विद्यमान नगरसेवक विजय पाटील, जयश्री पाटील, ज्योती गायकवाड, लीला आशान यांचा समावेश आहे. प्रभाग क्र.-१५ व १९ मध्ये कोट्यधीश उमेदवार आमनसामने आहेत. प्रभाग क्र.-१५ मधील शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक वसुधा बोडारे, धनंजय बोडारे यांच्यासह शीतल बोडारे, भाजपाचे नरेंद्र राजानी, तर प्रभाग क्र.-१९ चे भाजपाचे उमेदवार व नगरसेवक विजय पाटील, मीनाक्षी पाटील, विघमान नगरसेविका मीना सोंडे व शिवसेनेचे विनोद ठाकूर कोट्यधीश आहेत. यांच्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांपैकी टोनी सिरवाणी, वंदना भदाणे, राजेंदसिंग भुल्लर, मीना कौर भुल्लर, धनंजय बोडारे, वसुधा बोडारे, राजश्री चौधरी, जया साधवानी, मोहन साधवानी, मीना आयलानी, डॉ. प्रकाश नाथानी, प्रदीप रामचंदानी, जीवन इदनानी, आशा इदनानी, राजकुमार जग्यासी, विनोद ठाकूर, विजय पाटील, मीना सोंडे, रमेश चव्हाण, भरत गंगोत्री, अंजली साळवे, राजेश वानखडे हे उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपाचे नगरसेवक राजेश वानखडे यांची मुलगी सिमरन प्रभाग क्र.-१७ मधून भाजपाच्या तिकिटावर रिंगणात उतरली असून तिने आपल्याकडे संपत्तीच नसल्याचे जाहीर केले आहे. प्रचार रॅली, इतर दररोजचा खर्च त्या कसा दाखवणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह निवडणूक अधिकाऱ्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)