शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंचम कलानींकडे २३ कोटी ७५ लाख

By admin | Updated: February 18, 2017 05:03 IST

महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांचे शिक्षण बेताचे किंवा ‘अशिक्षित’ या श्रेणीचे आहे.

उल्हासनगर : महापालिका निवडणूक रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांचे शिक्षण बेताचे किंवा ‘अशिक्षित’ या श्रेणीचे आहे. मात्र, त्यांच्याकडील संपत्तीचे आकडे वाचले, तर डोळे पांढरे होतील. ओमी कलानी यांची पत्नी पंचम या सर्वात धनाढ्य उमेदवार असून त्यांच्याकडे २३ कोटी ७५ लाख रुपयांची माया आहे. मात्र, भाजपाच्या उमेदवार सिमरन वानखेडे यांनी आपल्याकडे शून्य संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रावर जाहीर केले. पंचम यांच्यापाठोपाठ भाजपाचे विजय पाटील यांच्याकडे १८ कोटींची संपत्ती आहे. विद्यमान ४ नगरसेवकांसह १३ उमेदवारांनी आपण अशिक्षित असल्याचे जाहीर केले आहे.उल्हासनगर महापालिकेच्या ७८ जागांसाठी ४७९ उमेदवार रिंगणात आहेत. पाच वर्षांपूर्वी ज्यांची संपत्ती लाखांत होती, त्यांची संपत्ती या वेळी कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ४७९ उमेदवारांपैकी ८० टक्के उमेदवार इयत्ता दहावीपेक्षा कमी शिकलेले आहेत. ज्या १३ उमेदवारांनी आपण अशिक्षित असल्याचे कबूल केले आहे, त्यामध्ये विद्यमान नगरसेवक विजय पाटील, जयश्री पाटील, ज्योती गायकवाड, लीला आशान यांचा समावेश आहे. प्रभाग क्र.-१५ व १९ मध्ये कोट्यधीश उमेदवार आमनसामने आहेत. प्रभाग क्र.-१५ मधील शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक वसुधा बोडारे, धनंजय बोडारे यांच्यासह शीतल बोडारे, भाजपाचे नरेंद्र राजानी, तर प्रभाग क्र.-१९ चे भाजपाचे उमेदवार व नगरसेवक विजय पाटील, मीनाक्षी पाटील, विघमान नगरसेविका मीना सोंडे व शिवसेनेचे विनोद ठाकूर कोट्यधीश आहेत. यांच्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांपैकी टोनी सिरवाणी, वंदना भदाणे, राजेंदसिंग भुल्लर, मीना कौर भुल्लर, धनंजय बोडारे, वसुधा बोडारे, राजश्री चौधरी, जया साधवानी, मोहन साधवानी, मीना आयलानी, डॉ. प्रकाश नाथानी, प्रदीप रामचंदानी, जीवन इदनानी, आशा इदनानी, राजकुमार जग्यासी, विनोद ठाकूर, विजय पाटील, मीना सोंडे, रमेश चव्हाण, भरत गंगोत्री, अंजली साळवे, राजेश वानखडे हे उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपाचे नगरसेवक राजेश वानखडे यांची मुलगी सिमरन प्रभाग क्र.-१७ मधून भाजपाच्या तिकिटावर रिंगणात उतरली असून तिने आपल्याकडे संपत्तीच नसल्याचे जाहीर केले आहे. प्रचार रॅली, इतर दररोजचा खर्च त्या कसा दाखवणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह निवडणूक अधिकाऱ्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)पंचम कलानी २३ कोटी ७५ लाखविजय पाटील १८ कोटीमीनाक्षी पाटील १२ कोटीमीना आयलानी ९ कोटीआशा इदनानी ८ कोटी ८३ लाखभरत गंगोत्री ८ कोटी ५५ लाख राजेंद्रसिंग भुल्लर ५ कोटीराजा गेमनानी ४ कोटी ७१लाखवंदना भदाणे ३ कोटी ७३ लाख भारिपचे नाना रौराळे, ओमी टीमचे सुंदर मंगतानी, गणेश जगताप, भाजपाचे महेश सुखरामानी, साई पक्षाचे अ‍ॅड. प्रवीण कृष्णानी, त्रिलोकाणी, उमेश केदार, भाजपाचे सहात्ता सचदेव, सोनू छापू, शिवसेनेच्या शीतल कदम-बोडारे, ठाकूर चांदवाणी, अपक्ष सुरेश सोनावणे, कुलदीप सिंघानी हे कोट्यधीश उमेदवार आहेत.