शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या १३०१ कामांसाठी २२ कोटी

By admin | Updated: September 13, 2016 02:19 IST

जलयुक्त शिवारसाठी यंदा १८ गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये या आर्थिक वर्षात विविध स्वरूपाची एक हजार ३०१ कामे हाती घेतली आहेत

ठाणे : जलयुक्त शिवारसाठी यंदा १८ गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये या आर्थिक वर्षात विविध स्वरूपाची एक हजार ३०१ कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी सुमारे २२ कोटी १५ लाख खर्च होणार आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेत शहापूर तालुक्यातील बाभरे, सावरोली, कराळे, बांधिवली, शिरोळ, वेहळोली, अजनूप या सात गावांचा समावेश आहे. मुरबाडच्या खुटल, बारागाव, मेंदी, केदुर्ली, डोंगरन्हावे, तुळई गावांत योजना राबवली जाणार आहे. याशिवाय, घोटगावर ता. भिवंडी, मामनोली ता. कल्याण आणि अंबरनाथमधील कुशिवली गावांचा समावेश आहे. गावांतील जलस्रोतांचे बळकटीकरण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. कृषी विभागाद्वारे २३ कामे, जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाची आठ कामे होणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८७ लाख मिळणार असून सीएसआरपोटी १९ लाख १२ हजार प्राप्त होणार आहेत. यंदा भातपिकाचे उत्पादन प्रतिहेक्टरी २५.५० किलो काढण्यात येणार आहे. त्यासाठी काही स्थानिक वाणांची लागवड करण्यात येणार आहे. यासोबतच कडधान्य व भाजीपाला घेण्यावरही भर असेल. सेंद्रिय शेती वाढवण्यासाठी ५० शेतकऱ्यांचा गट तयार केला जाईल. मोहापासून तेल तसेच मोगरा शेतीसाठी लागवड अशी काही उद्दिष्टे आम्ही निश्चित केली आहेत. यासाठी पाण्याच्या बाबतीत आम्हाला स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. त्यामुळेच यंदा जलयुक्त शिवाराची कामे अधिक नियोजनबद्धरीतीने पूर्ण करणार असल्याचा विश्वास कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी व्यक्त केला.