शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

२० टक्के पोलिसांना उच्च रक्तदाब

By admin | Updated: July 12, 2016 02:37 IST

मोर्चा, आंदोलन, सण, बंदोबस्त यामुळे १२ ते २४ तास आॅनड्युटी राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २० टक्के कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉलचा त्रास

भार्इंदर : मोर्चा, आंदोलन, सण, बंदोबस्त यामुळे १२ ते २४ तास आॅनड्युटी राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २० टक्के कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब व कोलेस्ट्रॉलचा त्रास होत असल्याचे २०१६ च्या सर्र्वेक्षणातून पुढे आले आहे. तसेच २००२ पासून या विकारांसह मधुमेह, दमा, मूत्रपिंड व फुप्फुसाच्या आजाराने दरवर्षी ११० हून अधिक पोलिसांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयाने पोलिसांसाठी घेतलेल्या आरोग्य शिबिरात हे उघड झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:च्या आरोग्याची काळजी न घेणाऱ्या पोलिसांचे आरोग्य स्पर्धेच्या व धावपळीच्या जगात धोक्यात असल्याचे वरील माहितीवरून स्पष्ट झाले. ड्युटीवर असताना अथवा ड्युटीवरून घरी परतत असताना आपल्या सहकाऱ्याला किंवा एखाद्या नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्यास त्या वेळी करायचे प्रथमोपचार तसेच पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी काय करावे, यासाठी पोलिसांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे वेळीच प्रथमोपचार मिळाल्याने पीडित रुग्णाचे प्राण वाचवल्यामुळे त्याला प्रभावी उपचार मिळण्याची शक्यता निर्माण होते. या विकारापासून दूर राहण्यासाठी दररोज व्यायाम, समतोल आहार, वेळेत आणि पुरेशी झोप आवश्यक असल्याचा सल्ला शिबिरातील डॉक्टरांकडून देण्यात आला. या वेळी रुग्णालयाचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी म्हणाले, पोलिसांना जडत असलेल्या विविध विकारांमागे त्यांना मिळणारी अपुरी झोप, रोजच्या खाण्यात व वेळेत बदल, कामाचा वाढता ताण असल्याने त्यांच्या शरीरात अपचन, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे विकार होतात. मधुमेह व उच्च रक्तदाबामुळेच अनेकदा हृदयविकाराचा, डोळ्यांचा व पक्षघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)