शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘एकवीरा’च्या कोळी यांना २० हजारांचा दंड

By admin | Updated: March 20, 2017 02:03 IST

ग्राहकाकडून सदनिकेचे पैसे स्वीकारूनही त्याला करारानुसार सदनिकेचा ताबा न देणाऱ्या एकवीरा एंटरप्रायजेसच्या धनंजय कोळी

ठाणे : ग्राहकाकडून सदनिकेचे पैसे स्वीकारूनही त्याला करारानुसार सदनिकेचा ताबा न देणाऱ्या एकवीरा एंटरप्रायजेसच्या धनंजय कोळी यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच ग्राहकाकडून घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. शालिनी संतोष यांनी कोळी यांच्या कुडूस येथील प्रकल्पातील एक सदनिका १२ लाख ४७ हजारांना घेण्याचे ठरवून २० मे २०१४ रोजी साठेखत करार केला. शालिनी यांनी कोळी यांना आधी ७ लाख ११ हजार आणि नंतर ३ लाख ८९ हजार १८० रुपये हप्त्याने दिले. नंतर, कोळी यांनी सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा आणि सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. साठेकरारानुसार जानेवारी २०१५ पर्यंत सदनिकेचा ताबा देण्याचे त्यांनी मान्य केले होते. परंतु, इमारतीचेच बांधकाम पूर्ण झाले नव्हते. तर, जानेवारी २०१६ मध्ये इमारतीचे आणि सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसल्यावर शालिनी यांनी उर्वरित रक्कम देऊन ताबा मिळावा, यासाठी कोळी यांना कुरिअरद्वारे नोटीस पाठवली. मात्र, नोटीस मिळूनही त्यांनी सदनिकेचा ताबा दिला नाही. त्यामुळे शालिनी यांनी कोळी यांच्याविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)