शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यासह मुंबईकरांसाठी ५५७ ट्रक भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:16 IST

आवक पुरेशी : पावसाच्या नावाखाली ग्राहकांची लूट

सुरेश लोखंडेठाणे : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह अन्यही ठिकाणी भाजीपाला, कांदे, बटाटे, फळे आणि अन्नधान्य आदींचा ५५७ ट्रक माल आजही आलेला आहे. ठाणेकरांसह मुंबईतील ग्राहकांना हा भाजीपाला पूरक आहे. पण, पावसाचे निमित्त करून भाजी मंडईत व बाजारात ग्राहकांना चढ्या भावात भाजीपाल्याची विक्री करत दुकानदार नाहक लूट करीत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

बुधवारी आणि गुरुवारी मुंबई, ठाण्यात धोधो पाऊस पडला. तरीदेखील गुरुवारी सकाळी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह कल्याणच्या बाजार समितीत ५५७ ट्रक पालेभाज्यांसह कांदा, बटाटा, अन्नधान्य, फळे, फुले आणि टोमॅटोंचा पुरवठा झाला आहे. अन्य काही दिवसांच्या तुलनेत काही अंशी जास्तच भाजीपाला या बाजार समित्यांमध्ये येत आहे. परंतु ठाणे, मुंबईतील पावसाचे कारण पुढे करून ग्राहकांची मनमानी लूट करीत चढ्या दराने भाजीपाला विकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे, मुंबई, पालघर हे कोकणचे जिल्हे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांत पाऊस नाही. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतातून निघत असलेल्या भाजीपाल्याच्या उत्पन्नावर शेतकरी कसेबसे तग धरून आहेत. यामुळे ठाणे, मुंबईच्या बाजार समित्यांमध्ये भाजीपाला, अन्नधान्यही मोठ्या प्रमाणात येत आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी भाजीपाला काढून बाजारात आणत आहेत. शेतात चिखल नसल्यामुळे वाहनेही जात आहेत. पण, ग्राहकांची दिशाभूल करून त्यांना चढ्या दराने भाजीपाला विकला जात आहे. पाऊस पडत असल्यामुळे शेतात वाहन जात नाही. मोठ्या कष्टाने काही ट्रक बाजारात आणले जात आहेत. यामुळे ट्रकचालक पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहता, त्यानुसार माल उतरवत असल्यामुळे भाजीपाला महागल्याचे दुकानदार सांगत आहेत. व्यापारी आणि दुकानदारांकडून लूट होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई बाजार समितीमध्ये ४८२ ट्रक अन्नधान्य, भाजीपालासर्वाधिक मोठ्या नवी मुंबई बाजारपेठेत ८९ ट्रक व ५०२ टेम्पो भाजीपाला गुरुवारी सकाळी आला. त्याचप्रमाणे अन्नधान्यासह कडधान्याचे १६८ ट्रक, ८० टेम्पोची आवक झालेली आहे. याशिवाय, ५६ ट्रक व २१८ ट्रेम्पोद्वारे फळे, तर ९५ ट्रक व ३६ टेम्पोद्वारे कांदा -बटाटा आणण्यात आलेला आहे. मसाल्याची वाहतूक ७४ ट्रक व १२९ टेम्पोद्वारे झालेली आहे. कल्याण बाजार समितीमध्येदेखील २३ ट्रक व ६८ टेम्पो भाजीपाला, तीन ट्रक फळे, १३ ट्रक आणि तीन टेम्पो कांदे-बटाटे, तर २६ टेम्पोने फुले आणण्यात आलेली आहेत. टोमॅटो पाच ट्रक आणि १२ टेम्पोतून आणण्यात आले आहेत.