शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या अर्थसंकल्पासाठी १६०० सूचना

By admin | Updated: March 20, 2017 02:08 IST

ठाण्याचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात नागरिकांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब पडावे म्हणून त्यांच्या सूचना मागवण्याचा

ठाणे : ठाण्याचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात नागरिकांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब पडावे म्हणून त्यांच्या सूचना मागवण्याचा प्रयोग आयुक्त संजीव जयस्वाल यांनी करताच १६०० हून अधिक ठाणेकरांनी त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे. या सूचनांचे स्वरूप अद्याप जाहीर केले नसले; तरी शिवसेनेला हात देणाऱ्या घोडबंदर, पोखरण रोड या परिसरातून सर्वाधिक सूचना आल्या आहेत. त्यामुळे नगरसेवक निधी कसा खर्च करावा, याबाबत आपल्या मतदारांची भूमिका शिवसेना मान्य करते की पालिकेचा हा प्रयोग हे नगरसेवकांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, ही भूमिका कायम ठेवते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.महापालिकेच्या संकेतस्थळावर हजारांहून जास्त नागरिकांनी अर्थसंकल्पाविषयी त्यांच्या असलेल्या अपेक्षा आणि सूचना मांडल्या आहेत. घोडबंदर आणि पोखरण रोड परिसरातील रस्ता रु ंदीकरणानंतर अग्निशमन विभाग आणि पाणी व्यवस्थापनासाठी अर्थसंकल्पामध्ये जास्त तरतूद करण्याची अपेक्षा मांडण्यात आली आहे. सांडपाण्याचा निचरा, रस्त्यांचा विकास, पार्किंग आणि वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून द्यावा, असे या नागरिकांचे म्हणणे आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्य ठाणेकारांच्या सूचनांचा समावेश करण्याच्या आयुक्तांच्या निर्णयाला लोकप्रतिनिधींचा थेट विरोध नसला, तरी लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा आणण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या मतदारांच्या सूचनांना प्राधान्य द्यायचे की आपल्या अधिकाराचा मुद्दा ताणून धरायचा अशी विचित्र कोंडी यामुळे नगरसेवकांची होणार आहे. आपले प्रश्न सुटावेत, रोजचे जगणे-प्रवास अधिका सुखकर व्हावा, यावर या मतदारांचा भर आहे. पालिकेच्या वेबसाईटवर हजारांहून अधिक आणि ठिकठिकाणी ठेवलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये ६०० पेक्षा अधिक नागरिकांनी सूचना टाकल्या आहेत. यात संपूर्ण ठाणे शहरातून सूचना आल्या असल्या, तरी घोडबंदर, पोखरण पट्ट्यातील नागरिकांचा अधिक सहभाग आहे. (प्रतिनिधी)