शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी लागू झाल्यास १५६ कोटी?

By admin | Updated: May 10, 2017 00:00 IST

येत्या १ जुलैपासून गुड्स अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) लागू झाल्यावर मीरा-भार्इंदर महापालिकेला महिनाकाठी सुमारे १३

राजू काळे। लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : येत्या १ जुलैपासून गुड्स अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) लागू झाल्यावर मीरा-भार्इंदर महापालिकेला महिनाकाठी सुमारे १३ कोटींचा निधी यानुसार वर्षभरात १५६ कोटी रुपये प्राप्त होणे अपेक्षित आहे. जेव्हा महापालिका हद्दील एलबीटी लागू केला होता, तेव्हा वर्षाकाठी २१५ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होत होते. त्यामुळे एकीकडे जीएसटीत फटका बसण्याची चिन्हे असतानाच मुद्रांक शुल्कावरील अधिभार रद्द झाला, तर आर्थिक फटक्याची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. पालिकेच्या मुख्य उत्पन्न स्रोतापैकी एक जकातवसुलीला राज्य सरकारने व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार २००९ मध्ये हद्दपार करीत २०१० मध्ये एलबीटी लागू केला. एलबीटीलादेखील विरोध होऊ लागल्याने त्याची वसुली २०१६ मध्ये बंद करण्यात आली. अखेर, केंद्राकडून १ जुलैपासून राज्यात जीएसटी लागू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यावर, विधिमंडळाचे विशेष सत्र होणार आहे. त्यानंतर, जीएसटीखेरीज इतर माध्यमातून होणाऱ्या वसुलीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या पालिकेची थकीत एलबीटीवसुली सुरू असून शहरातील नागरिकांना मालमत्तानोंदणीच्या मुद्रांक शुल्कावर अतिरिक्त १ टक्का अधिभार भरावा लागत आहे. तो जीएसटी लागू झाल्यानंतरही भरावाच लागणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. त्याचाही निर्णय विधिमंडळाच्या त्याच सत्रात होण्याची शक्यता आहे. अधिभार मागे घेतल्यास मुद्रांक शुल्काचा आर्थिक भार काहीसा हलका होण्याची शक्यता असली, तरी पालिकेच्या अनुदानात घट होणार आहे. एलबीटी बंद झाल्यानंतर पालिकेची एकूण मागणी २१५ कोटी इतकी होती. त्यापैकी पालिकेने २०३ कोटी २३ लाखांची वसुली केली. यात मद्यविक्रीसह ५० कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडून वसूल झालेल्या २८ कोटी ६६ लाख एलबीटीचा समावेश आहे. शहरात ५० कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांची संख्या केवळ १९ इतकीच आहे. मुद्रांक शुल्कावरील अधिभारापोटी पालिकेला ४० कोटी ७६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले, तर एलबीटीच्या नुकसानभरपाईपोटी राज्य सरकारने पालिकेला १३३ कोटी ८१ लाखांचे सहायक अनुदान दिले. आता जीएसटीच्या माध्यमातून पालिकेला सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात गतवर्षीच्या सहायक अनुदानापोटी मिळालेल्या निधीत सुमारे १० टक्के वाढ होऊन महिन्याकाठी सुमारे १३ कोटींचा निधी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत,