शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मंडईतील १५ टक्के गाळे शेतक-यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 05:41 IST

राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रांतील भाजी मंडईतील १५ टक्के गाळे खास शेतक-यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नारायण जाधव ।ठाणे : कर्जमाफी, हमीभाव आदी मागण्यांकरिता शेतकरी संघटनांकडून करण्यात येणा-या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रांतील भाजी मंडईतील १५ टक्के गाळे खास शेतक-यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.‘संतशिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडाबाजार अभियानां’तर्गत नगरविकास विभागाने याबाबतचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले असून राज्य कृषी पणन मंडळाच्या शिफारशीवरून हे गाळे शेतकरी उत्पादित गट किंवा कंपनीस द्यावयाचे आहेत.यामुळे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, वसई-विरार आणि पनवेल या नऊ महापालिकांसह अंबरनाथ, बदलापुरातील रहिवाशांना आता शेतकºयांनी पिकवलेला ताजा शेतमाल, वाजवी किमतीत मिळेल. शिवाय, त्या त्या क्षेत्रातील महापालिका अधिकाºयांसह फेरीवाला संघटनांच्या दादागिरीपासूनही शेतकºयांची सुटका होणार आहे. याशिवाय, शेतकºयांनी उत्पादित केलेला शेतमाल शहरात विकता यावा, याकरिता नगरपालिका क्षेत्रात आठवड्यातून एक मैदान आणि महापालिका क्षेत्रात किमान तीन मैदाने दरशनिवारी किंवा रविवारी उपलब्ध करून द्यावीत. तसेच या शेतकरी बाजाराकरिता शेड्स उभाराव्यात, असे आदेश यापूर्वीच दिले आहेत. आठवडाबाजाराची संकल्पना महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या मार्गदर्शनानुसार राबवावी, यासाठी निवडलेली जागा योग्य आहे किंवा नाही, याबाबत पणन मंडळाचा अभिप्राय घ्यावा, असेही बजावण्यात आले आहे. शेतकरी आठवडाबाजाराच्या जागेसाठी आवश्यकता असेल, तेथे आरक्षणाची तरतूद करावी, असे नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे.>महापालिकांच्या मालकीच्या भाजी मंडयांमध्ये १५ गाळे आरक्षित ठेवण्याच्या शासन निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यात खºया शेतकºयांना प्राधान्य मिळायलाच हवे. बोगस शेतकरी त्यात घुसता कामा नये. तसेच शेतकºयांना हमीभाव, कर्जमाफी मिळायलाच हवी. त्यासाठीचे आमचे आंदोलन सुरूच राहील. शेतकºयांच्या आंदोलनाची धार अशा निर्णयांमुळे कमी होणार नाही. त्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. अशा तुटपुंजा प्रयत्नांतून काहीही साध्य होणार नाही.- डॉ. अजित नवले, नेते, शेतकरी किसान सभा