शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

१३ कोटींच्या मजुरीसाठी मंगळवारी हाय वे रोखणार

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

रोजगार हमी योजनेतंर्गत काम करूनही गेल्या तीन महिन्यांपासून मजूर पगारापासून वंचित आहेत. येत्या दोन दिवसात पगार दिला

विरार :रोजगार हमी योजनेतंर्गत काम करूनही गेल्या तीन महिन्यांपासून मजूर पगारापासून वंचित आहेत. येत्या दोन दिवसात पगार दिला नाही तर ५ एप्रिलला श्रमजीवी संघटना मुंबईकडे जाणारे सर्व महामार्ग रोखून धरणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिली. १ जानेवारी २०१६ ते ३० मार्च २०१६ दरम्यान पालघर जिल्ह्यात रोजगार हमी अंतर्गत सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत व यंत्रणामार्फत ९ हजार २४ कामे करण्यात आली. या कामासाठी तब्बल ७ लाख ९४ हजार ३४८ दिवस काम झाले. मजुरांची १३ कोटी ४८ लाख २८ हजार इतकी मजूरी मिळणे आवश्यक होते. मजूरांनी अनेकवेळा शासकीय कार्यालयात हेलपाटे घालूनही त्यांना मजूरी मिळाली नाही. किमान आर्थिक वर्ष संपत असताना मजूरांच्या खात्यामध्ये मजुरी येणे अपेक्षित होते. परंतू मजूरांच्या पदरी निराशाच पडली, असे पंडित यांनी सांगितले.जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांची मजुरी रोजगार हमी कायद्यानुसार ०.५टक्के व्याजासहित पुढील दोन दिवसात मजुरांच्या खात्यात जमा न झाल्यास ५ एप्रिल २०१६ रोजी श्रमजीवी संंघटना मुंबईकडे जाणारे सर्व महामार्ग रोखेल असा इशारा पंडित यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)आम्ही जगायचे कसे?१) जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदि अतिदुर्गम भागात आॅक्टोबर २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाड्यापाड्यात रोजगार हमी अंतर्गत कामाची मागणी करणारे अर्ज भरुन घेण्याचे अभियान राबवले. या अभियानानंतर कामाच्या मागणीत मागील वर्षीपेक्षा या वर्षी १० ते १५ पट जास्त वाढ झाली.२) जव्हार तालुक्यात मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ साली कामाची मागणी १३ हजार ६६२ दिवस होती. श्रमजीवी संघटनेच्या अभियानानंतर आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ साली कामाची मागणी २ लाख २२ हजार ८६४ मनुष्य दिवस म्हणजेच मागणी २० पटीने वाढली. ३) मोखाडा तालुक्यात आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ साली कामाची मागणी २१हजार ५७१ मनुष्य दिवस व श्रमजीवीच्या अभियानानंतर कामाची मागणी ९१हजार ९८६ मनुष्य दिवस म्हणजेच कामाची मागणी ४ पटीने वाढली. ४) जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु आता वेतन द्यायला पैसे नाहीत. मजुरांना काम मिळाले. पण उपासमार तशीच राहिली. आधीच दारिद्र्य, कुपोषणाने ग्रासलेल्या व काम करुनही मजुरी मिळत नसल्यामुळे आदिवासी समाज जगायच कसे असा प्रश्न पंडित यांनी उपस्थित केला आहे.