शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

टीडीसीसी बँक निवडणुकीत १०३ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:11 IST

आज छाननी : विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह सहा जण बिनविरोध विजयी

 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) २१ संचालक पदांसाठी निवडणूक होत असून, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी १०३ जणांनी त्यांचे २०६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह आधीचे तीन संचालक आणि दोन नवीन अशा सहा जणांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल  झाला नाही. त्यामुळे ते बिनविरोध विजयी झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा वसई तालुका या मतदारसंघातून अध्यक्ष पाटील बिनविरोध विजयी झाले. याशिवाय अंबरनाथचे विद्यमान संचालक  राजेश पाटील, जव्हारचे दिलीप पटेकर यांच्यासह ठाण्यातील विद्यमान संचालक बाबाजी पाटील विजयी झाले आहेत. याशिवाय प्रथमच आणि बिनविरोध विजयी होणाऱ्यांमध्ये माजी आमदार अमित घोडा हे असून, ते डहाणू मतदारसंघातून विजयी झाले. त्यांचे वडील व माजी आमदार कृष्णा घोडा या मतदारसंघातून विजयी होत असत. याप्रमाणे मोखाडा तालुक्यातून  बाबुराव दिघा हे  प्रथमच बिनविरोध विजयी झाले आहेत. या मतदारसंघातून ॲड. देवीदास पाटील निवडून येत असत. पाटील यांचे निधन झाले. बिनविरोध विजयी झालेल्यांमधील पाच संचालक आमचेच असल्याचा दावा विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’कडे केला. टीडीसीसी बँकेच्या २१ जणांच्या संचालक मंडळासाठी ३० मार्च रोजी मतदान होऊन मतमोजणी ३१ मार्च रोजी पार पडणार आहे. शेवटच्या दिवसापर्यंत  प्राप्त झालेल्या २०६ उमेदवारी अर्जांची छाननी उद्या  (शुक्रवार) ५ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर या निवडणुकीच्या रिंगणातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल. ८ ते २२ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत हाेती. या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची दाट शक्यता आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी उमेदवारी मागे घ्यावी, याकरिता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. २२ मार्चनंतर २१ जागांकरिता नेमके किती उमेदवार रिंगणात व कोण बिनविरोध निवडून आले, ते स्पष्ट होईल.

nराज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये श्रीमंत बँक म्हणून टीडीसीसी बँकेचा लौकिक आहे. या बँकेची वार्षिक उलाढाल तब्बल साडेदहा हजार कोटींची आहे. nमहाविकास आघाडीतील पक्ष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी त्यांचे समर्थक निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. सत्ताधारी बँक संचालकांकडून या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

nबहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील बिनविरोध विजयी झाले. मात्र, विद्यमान उपाध्यक्ष भाजपचे भाऊ कुऱ्हाडे यांच्या  पतसंस्थांच्या मतदारसंघात त्यांना तब्बल १३ इच्छुकांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यापैकी किती माघार घेणार, त्यावर भाजपच्या संचालकांचे भवितव्य अवलंबून आहे.