शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

१०० सीसीटीव्हींचा वॉच

By admin | Updated: September 15, 2016 02:20 IST

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांसह पालिका प्रशासन सज्ज झाले आहे

भार्इंदर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांसह पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. केवळ मुख्य मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक नरसिंग भोसले यांनी सांगितले. दरम्यान, मिरवणुकीवर १०० पेक्षा अधिक सीसीटीव्हींची नजर राहणार आहे.गणपती विसर्जनासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी एकूण ५५० पोलीस कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती केली आहे. त्यात १ अतिरिक्त अधीक्षक, ४ उपअधीक्षक, ४५ अधिकारी व ५०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ५० होमगार्ड, ८० वाहतूक कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डन, दंगल नियंत्रण पथक, महिलांसाठी छेडछाडविरोधी पथके, घातपातविरोधी पथके विसर्जनमार्गांसह विसर्जनस्थळी तैनात करण्यात आली आहेत. तसेच शीघ्र कृती दलाच्या तीन पथकांना पाचारण करण्यात आले असून काशिमीरा, मीरारोड व नवघर परिसरात सज्ज ठेवण्यात आली आहेत. पोलिसांच्या मदतीसाठी गेल्यावर्षीप्रमाणे मुस्लिम समाजातील सुमारे १२० स्वयंसेवक घेण्यात आले आहेत. त्यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे १५०, राष्ट्रीय छात्रसेनेचे ६० व इतर सामाजिक संस्थांच्या २५० स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरभर सुमारे १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यावर, विशेष कक्षासह पोलीस व पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. विसर्जनासाठी भार्इंदर पश्चिमेकडील पोलीस ठाणे ते खाडीपर्यंतचा मुख्यमार्ग व भार्इंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्ट वाहतूक बेट ते फाटकमार्गे स्टेशन रोड व जेसलपार्क चौपाटीदरम्यानच्या मुख्य मार्गावर रिक्षा, बस यांना सायंकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत तात्पुरती बंंदी घातली आहे. विसर्जनस्थळे भार्इंदर पश्चिमेकडील खाडीसह मांदली, राव, मुर्धा, राई व मोर्वा तलाव, उत्तन परिसरासाठी नवी खाडी भार्इंदर पूर्वेस जेसलपार्क चौपाटी, गोडदेव, नवघर तलाव काशिमीरा येथे जरीमरी, सुकाळा, एमआयडीसी तलाव, घोडबंदर येथे चेना नदी, काजूपाडा खदाण, रेतीबंदर, संक्रमण शिबिराजवळील तलाव मीरारोड येथे शिवार गार्डन तलावात विसर्जनाची सोय करण्यात आली असून प्रत्येक ठिकाणी विसर्जनासाठी विशेष मनुष्यबळ व विसर्जन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मीरा रोड : जेसल पार्क खाडीकिनारी मोठ्या गणपतीमूर्तींच्या विसर्जनासाठी रेल्वेमार्गाजवळील जुन्या धककयावर दोन क्रेनची व्यवस्था करण्याची मागणी ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी केली आहे. नवीन धककयावर दोन क्रेन व एक फोरक्लिप्स असते. पण, शेवटच्या दिवशी विसर्जनासाठी मोठी गर्दी होते. मोठ्या मूर्तींची संख्या जास्त असल्याने विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजतात. यंदा पहाटे ५ पर्यंत भरती आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाजवळील जुन्या धक्क्यावर मोठ्या मूर्तींसाठी दोन क्रेनची व्यवस्था केल्यास विसर्जन पहाटे ५ पर्यंत भरतीच्या वेळेत पूर्ण होईल, अशी मागणी पाटील यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे केली आहे.पालिकेनेही सुमारे ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके विसर्जनस्थळी नियुक्त केली आहेत. महत्त्वाच्या विसर्जनस्थळी रुग्णवाहिकांसह डॉक्टर, परिचारिका, आवश्यक औषधांचा साठा, अग्निशमन दलाच्या गाड्या व जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणी डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भार्इंदर खाडीसह जेसलपार्क चौपाटी येथे प्रत्येकी १ मोठी क्रेन, प्रत्येकी २ फोरक्लिप्स, तराफे व पुरेशा उजेडासाठी हायमास्ट व उच्च प्रकाशाच्या दिव्यांची सोय करण्यात आली आहे. या दिवशी सुमारे अडीच हजारांहून अधिक गणपतीमूर्तींचे विसर्जन होणार आहे.