शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

ई- वाचनालयााठी १० रूपये शुल्क

By admin | Updated: May 23, 2017 01:34 IST

महापालिकेच्या अभ्यासिका व ई-वाचनालयासाठी आता महिना केवळ १० रुपये शुल्क आकारण्याचा ठराव महासभेने केला आहे. शिवाय रात्रभर अभ्यासिका खुल्या राहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : महापालिकेच्या अभ्यासिका व ई-वाचनालयासाठी आता महिना केवळ १० रुपये शुल्क आकारण्याचा ठराव महासभेने केला आहे. शिवाय रात्रभर अभ्यासिका खुल्या राहणार आहेत. मीरा भार्इंदर महापालिकेकडून शहरात नऊ अभ्यासिका व चार इ- वाचनालय चालवले जाते. शहरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सोय व्हावी तसेच शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त माहिती मिळावी म्हणून वाचनालय सुरू करण्यात आले आहे. पालिकेकडून अभ्यासिकेसाठी ५०० रूपये वार्षिक शुल्क, लॉकर हवा असेल तर आणखी ५०० रूपये वार्षिक शुल्क आकारले जाते. तर इ- वाचनालयासाठी एक हजार अनामत रक्कम व महिना २०० रूपये शुल्क आकारले जाते. ई- वाचनालयाचा वापर रोज एक तास करता येतो. परंतु पालिकेची अभ्यासिका व वाचनालयासाठी असलेले मासिक शुल्क व अनामत रक्कम जास्त असल्याने ती कमी करण्याची मागणी नगरसेवक डॉ. राजेंद्र जैन यांनी केली होती. त्या अनुषंगाने महासभेत अभ्यासिका व इ वाचनालयाचे दर कमी करण्याचा प्रस्ताव आणला होता. डॉ. जैन यांनी मांडलेल्या ठरावानुसार आता अभ्यासिका वा इ- वाचनालयाचे शुल्क प्रती महिना केवळ १० रूपये केले आहे. तर ई- वाचनालयासाठी आता ५०० रुपये अनामत रक्कम केली आहे. लॉकर घेतल्यास मासिक शुल्क १५ रुपये आकारले जाणार आहे. शिवाय अभ्यासिका व ई- वाचनालय रात्रभर मुलांना अभ्यासासाठी खुली ठेवली जाणार असून सुरक्षाही ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. गरीब घरातील मुलांना या अभ्यासिकेचा अधिक फायदा होईल असे सांगण्यात आले.